" झाडे लावा , झाडे जगवा ". २८ जून हा जागतिक पर्यावरण दिवस. निसर्गाला इजा न पोहचवता निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गाचा आनंद घ्यायला पाहिजे .
आजच्या दिवशी शाळेतील सर्व मुलांनी प्रत्येकी एक रोप आणून ते शाळेच्या आवारात त्याचे रोपण केले.त्याच बरोबर जागतिक पर्यावरण दिवस चे सुविचार फलक हातात घेऊन मोर्चा काढला व सामाजिक संदेश दिला.झाडे जगवा, पाणी वाचवा, झाड नाही तर ऑक्सीजन नाही, असा नारा देत इयत्ता शिशुविहार ते दहावी च्या सर्व विद्यार्थ्यांनी संमेलन केले. शाळेतील सर्व शिक्षकांनी देखील ह्या संमेलनात सहभाग दर्शवला होता.
जे एम एफ संस्थेचे अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी सर्व मुले नैसर्गिक जबाबदारी चे पालन आणि कर्तव्य करत आहेत हे बघून त्यांचे अभिनंदन केले.
नैसर्गिकरीत्या असलेली झाडे, फुले, म्हणजेच एका अर्थाने ते परमेश्वराचे रुप आहे आणि त्यांना आपण पाणी देऊन जगवतो, म्हणजे परमेश्वराची कृपा आपल्यावर आहे, असे सांगून डॉ राजकुमार कोल्हे यांनी मुलांबरोबर स्वतः देखील वृक्षारोपण केले.
सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी सर्व मुलांच्या हातात रोपटे एकेक रोपटे दिले, व ज्याप्रमाणे आपल्याला इजा झाल्यावर डोळ्यात पाणी येते, अगदी त्याच प्रमाणे अकारण झाडांना, वेलींना, फुलांना तोडले अथवा पाणी नाही दिले तर त्यांनाही आपल्या सारखीच इजा होते असे उदाहरण देऊन सर्व मुलांना झाडे लावण्यासाठी आणि ती जपण्यासाठी प्रोत्साहित केले व स्वतः संमेलनात मुलांच्या बरोबरीने चालत शाळेच्या आवारात आणि शाळेच्या बाहेर वृक्षारोपण केले.
पांढरा रंगाचा पेहराव आणि हातात हिरव्या रंगाचे रोपटे घेऊन आलेली मुले ही इंदर्धनुष्याच्या रंगा प्रमाणे आल्हादायक दिसत होती.
सर्वत्र शाळेत हरित रंगाचे गालिचे दिसत होते.म्हणूनच बालकवी ठोंबरे म्हणतात..हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणा च्या मखमाली चे..
0 टिप्पण्या