शनिवार दि.१५जून२०२४रोजी संध्याकाळी ५वाजता अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाची विशेष सभा, ज्येष्ठ नागरिक छळप्रतिबंध जागृती दिनाचे औचित्य साधून ढोकळेसर काॅन्फरन्स हाॅल,मधुबन अपार्टमेन्ट,घनशाम गुप्ते रोड,डोंबिवली(प.)येथे आयोजीत करण्यात आली होती.मा. प्राचार्य श्री.व्ही,के.भदाणे, अध्यक्ष आयस्काॅन हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
मा.प्राचार्य श्री.व्ही.के.भदाणे,अध्यक्ष आयस्काॅन,व शिक्षण महर्षी मा.श्री.केशव भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेत श्री.प्रविण दामले,प्रोजेक्ट मॅनेजर,तुलशी ट्रष्ट यांचे बीज भाषण झाले.
दीप प्रज्वलन,इशस्तवन व सानेगुरुजींच्या खरा तो एकची धर्म या प्रार्थना गीताने सभेच्या कार्यवाहीस प्रारंभ झाला.
प्रमुख पाहुणे प्राचार्य व्ही.के.भदाणे व श्री.केशव भोईर यांचा श्री.एम.एन.ढोकळे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
श्री.एम.एन ढोकळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सभेचे प्रयोजन सांगत डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिक चळवळीची माहिती देत भविष्यात संघटीतपणे करावयाच्या एकूण कामाचा आढावा घेतला.
श्री.प्रविण दामले यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा मांडल्या.विशेषत: ज्यांना निवृत्ती वेतन नाही वा ज्यांना ते अत्यल्प मिळते त्यांचे जगणे कसे अवघड झाले आहे हे त्यांनी अनेक उदाहरणे देत स्पष्ट केले.ते म्हणाले 'शासनही ज्येष्ठ नागरिक चळवळीची पुरेशी दखल घेत नाही.ज्येष्ठ नागरिकांनी आपल्यातील आर्थिक कारणाने निर्माण झालेली आर्थिक व वैचारिक दरी दूर करणेही अत्यंत गरजेचे आहे.'
श्री.प्रविण दामले यांना शाल पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
श्री.केशव भोईर यांनी संघटीतपणे आपण कार्य केल्यास यशप्राप्ती होईल हा आशावाद आपल्या मनोगतात व्यक्त केला.
श्री.एम.एन.ढोकळे यांची आयस्काॅनच्या शिक्षण व मार्गदर्शन समिती अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल त्यांचा शाल,पुष्पगुच्छ व नियुक्तीपत्र देत प्राचार्य व्ही.के.भदाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डोंबिवलीतील सुप्रसिध्द स्रीरोगतज्ञ डाॅ.अरविंद प्रधान यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सभेला सर्वश्री.विवेक देशपांडे,मुख्य सचिव फेस्काॅम,श्या.गो.पाटील,अध्यक्ष फेस्काॅम कोकण प्रा.विभाग डाॅ. नामदेवराव डफळ,श्री.अंकुश जांभळे आयस्काॅन पदाधिकारी व श्री.भिडे माजी अध्यक्ष,विष्णूनगर ज्ये.ना.संघ व्यासपीठावर उपस्थित होते त्या सर्वांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
प्राचार्य व्ही.के.भदाणे यांनी प्रारंभीच ज्यांनी डोंबिवलीत आपल्या तरूण वयात भारतातील पहिला ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करून ज्येष्ठ नागरिक चळवळीची मुहुर्तमेढ रोवली त्या स्वर्गीय राधाकृष्ण भटांचा आदरपूर्वक उल्लेख करत.डोंबिवलीतील वीस ज्येष्ठ नागरिक संघांच्या कार्या बद्दल समाधान व्यक्त केले.आपण भारतात सर्वदूर प्रवास करत असून ज्येष्ठांची देशांतर्गत स्थिती सांगत त्यांनी आलेले काही अनुभव सांगितले. पुढे करावयाच्या कामाचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
सभेला डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिक संघांचे प्रतिनिधी,ब्रम्हाकुमारी ईश्वरीय संस्था,गायत्री परिवार,वामनराव पै परिवार,जैन समाज प्रतिनिधी,आचार्य अत्रे कट्टा सदस्य आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.अकुश जांभळे व डाॅ.अमित दुखंडे यांनी केले,
श्री.एम.एन.ढोकळे यांच्या आभार प्रदर्शनानंतर राष्टगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
शब्दांकन श्या.गो.पाटील

.jpeg)


0 टिप्पण्या