मल्हार सादर करत आहे २०२४ ची थीम, “विवा ला विदा”


सेंट झेवियर्सच्या कॉलेजचं प्रसिद्ध वार्षिक इंटरकॉलेजिएट स्पर्धोत्सव मल्हार १५, १६ आणि १७ ऑगस्ट २०२४ रोजी रंगणार



थीम: विवा ला विदा- अलाइव विथ पॅशन 

मल्हार म्हणजे झेवियर्सच्या मुलांसाठी एक आनंदोत्सव, एक अविस्मरणीय कार्यक्रम. दरवर्षी सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांद्वारा आयोजित केल्या जाणाऱ्या ह्या फेस्ट मल्हार मध्ये नानाविधी कार्यक्रमांची जणू पर्वणीच असते. मागच्या वर्षी संगीतकार एपी ढिल्लोन, ह्यांचा कॉन्सर्ट खूप गाजला होता. त्यांच्या खुमासदार गाण्यांनी कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आणली होती. भारताचे माजी राष्ट्रपती माननीय डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्यानीही ह्या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.आतापर्यंतर्यं अनुपम खेर ,नसरुद्दीन शाह, रोहित सराफ, प्राजक्ता कोळी असे अनेक दिग्गज कलाकारांनी मल्हार ची शोभा वाढवली आहे.



ह्या वर्षी मल्हार ची थीम “विवा ला विदा” अशी आहे. आयुष्य मनमोकळेपणाने जगा, असा ह्या थीम चा अर्थ.'विवा ला विदा'  हे विचार आपल्याला जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा कानमंत्र देतात. जीवनामध्ये सुख, संतोष, आणि समृद्धीचे अनेकविध रंग आहेत. अशा या रंगांमध्ये आपले जीवन समृद्ध बनवून, आपण आपल्या स्वप्नांच्या यात्रेला पुढे नेण्याची आवश्यकता असते. आयुष्याच्या खडतर वाटेवर येणाऱ्या संकटांमधून मार्ग कसा काढायचा हे आपणास शिकायला हवे. आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आणि आपल्या जीवनात सकारात्मक परिणाम साधण्यासाठी, आपण आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणावर प्रेम करत राहण्याची आवश्यकता आहे. ही थीम आपल्या जीवनातील स्वाभाविक समृद्धीचा अनुभव करण्याचा आणि सुखद जीवनाच्या मार्गावर चालत राहण्याचा अद्वितीय विचार देते. सामर्थ्य आणि स्वातंत्र्यचा प्रतीक म्हणजेच मल्हार. शेवटी मल्हार म्हटलं तर उत्साह दांडगा असणारच. मुंबई, तरुणाई, नाच, संगीत, साहित्य याचं सुंदर मिश्रण म्हणजे मल्हार! 


अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा :

Akshada Sinha (ऑर्गनायजर इन चार्ज , पब्लिक रिलेशन्स ) ─ +91 88780 25220,

malhar.pr@xaviers.edu.in


Khyati Pandya (ऑर्गनायजर, प्रेस) ─ +91 83559 57119, khyati.pandya@xaviers.edu.in

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या