श्रीहरी प्रतिष्ठान, नामपूर यांच्यावतीने ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील उत्कृष्ठ काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. ऍडव्होकेट मंजुषा कजवाळकर, अध्यक्षा आई बानाई महिला प्रतिष्ठान मालेगाव यांच्या हस्ते साहित्यिका सौ. गीतांजली वाणी यांना साहित्यिक क्षेत्रातील उत्कृष्ठ योगदानासाठी नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गीतांजली वाणी ह्यांचे दर्पण चारोळी संग्रह व काव्यांगी अष्टाक्षरी काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. साहित्यिक क्षेत्रातील नानाविध पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत ग्रंथापाल म्हणून त्या एकोणवीस वर्षांपासून कार्यरत आहेत आणि विविध उपक्रमातून वाचन संस्कृतीची जोपासना करत आहेत. त्या उत्कृष्ठ निवेदिका आहेत. ह्या सोहळ्यात प्रोत्साहन फॉउंडेशन अध्यक्ष श्री. गिरीश वाणी, लाडशखीय वाणी समाज मंडळ, संभाजी नगर श्री. राजेंद्र वाणी, सेवाभावी कार्यकर्त्या संगिता बोरसे, सौ. चित्रा चितोडकर अध्यक्षा बहुउद्देशीय संस्था धुळे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ठ आयोजन श्रीहरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. शरद नेरकर, सरचिटणीस सौ स्नेहलता नेरकर, प्रोत्साहन फॉउंडेशन समिती सदस्य श्री. प्रकाश मालपूरे, श्री. प्रदीप गहिवरे, श्री. शशिकांत महालपुरे, श्री. पाटकर आदी मान्यवरांनी केले होते.
सुप्रसिद्ध साहित्यिका सौ. गीतांजली वाणी श्रीहरी प्रतिष्ठान नामपूर यांच्या वतीने नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित
सुप्रसिद्ध साहित्यिका सौ. गीतांजली वाणी श्रीहरी प्रतिष्ठान नामपूर यांच्या वतीने नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित


0 टिप्पण्या