श्री दत्तकृपा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध संपन्न. --------अध्यक्षपदी वामन सुतार ,

 


सचिव पदी  बाळासाहेब पवार ,खजिनदारपदी सीमा साबळे यांची निवड.


मुंबई  (प्रतिनिधी ) चेंबूर वाशी नाका मुंबई येथे एमएमआरडीए अंतर्गत असणारी श्री दत्तकृपा को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या संस्थेची व्यवस्थापक समितीची सन 2024 ते 2029 या पंचवार्षिक कालावधी करिता पंचवार्षिक निवडणूक सहकारी संस्थेचे  उपनिबंधक प्रशांत सातपुते साहेब व सहकारी अधिकारी श्रेणी 1 श्रीमती  निकम मॅडम  यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निवडणूक निर्णय अधिकारी  प्रभाकर तुकाराम कांबळे  (S.E.O.) संस्थेचे प्रशासक व्ही .एम. तंगा  यांच्या अधिपत्याखाली बिनविरोध निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून अध्यक्षपदी वामन शंकर सुतार सचिव पदी बाळासाहेब अर्जुन पवार तर खजिनदारपदी सीमा प्रशांत साबळे  तसेच  संचालक पदासाठी संदीप एच. यादव ,     शफकत मोहम्मद झमान शेख ,सचिन जाधव ,गणेश देवेंद्र ,अशोक गुंजले ,संजीवराव        बुया ,संचालिका म्हणून माया राकेश मोर्या यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याचे संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाकर कांबळे यांनी  आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

         श्री दत्तकृपा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी मध्ये गेली दोन वर्षे प्रशासक म्हणून व्ही .एम.तंगा  काम पहात होते. त्यांनी संस्थेचा कारभार सुरळीत झाल्यानंतर व्यवस्थापक समितीची पंचवार्षिक निवडणूक घेण्याचे सर्व सभासदांच्या वतीने ठरविण्यात आले असून सर्वानुमते निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्यानुसार नामनिर्देशन अर्ज प्रवर्गानुसार भरून घेण्यात आले असून आलेल्या अर्जाची छाननी करून बिनविरोध निवडणूक पार पडली .त्यामध्ये बिनविरोध निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातून होत असून कार्यक्रमाला सोसायटीतील सर्व  सभासद आवर्जून उपस्थित होते ..सर्व सभासद व पदाधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे आभार प्रशासक व्ही .एम .तंगा साहेब यांनी मांडले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या