मुंबई (प्रतिनिधी ) नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत सी.बी.डी. बेलापूर कोकण भवन येथे असलेली सहकारी संस्था निबंधकांची कार्यालय मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत स्थलांतरित करण्याची मुंबई पूर्व उपनगरातील सहकारी संस्थाधारक व सभासदाच्या वतीने सहकारातील निष्ठावान कार्यकर्ते व सहकार मित्र प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी प्रसिद्ध पत्राद्वारे मागणी केली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील एल,एम,एन,व एस वार्ड मध्ये असलेल्या कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर विद्याविहार व विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप भागातील सहकारी गृहनिर्माण, सहकारी पतसंस्था व सेवा सहकारी संस्थांची जिल्हा निबंधक व उपनिबंधक यांची कार्यालये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत असायला पाहिजेत, पण सन 1981 पासून ती नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत असल्याने सहकारी संस्थेच्या संस्था चालकांना व कार्यकर्त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे ....पण लक्षात पण घेतो.. असा सवाल ही संस्था चालकाकडून करण्यात येत आहे.
सहकारी क्षेत्र हा देशाचा त्याचबरोबर सर्वसामान्य समाजाचा आर्थिक कणा असून तेच आर्थिक बलवान आणि आर्थिक दृष्ट्या सशक्त होण्यासाठी सहकार क्षेत्राकडे अन्न पर्याय आहे हेच कार्य सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून सुरू आहे सहकारी पतसंस्था टिकल्या तरच मोठमोठ्या बँका टिकतील व सर्वसामान्य सभासद व सहकारी संस्था धारकाचे जीवन व्यवस्थितपणे चालेल. यासाठी महाविकास आघाडी सरकारने घाटकोपर विक्रोळी कांजूरमार्ग कुर्ला चेंबूर मानखुर्द येथे राहणाऱ्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या सभासदांना इतर वार्डाच्या तुलनेत दुजाभाव झालेला आहे त्यामुळे मुंबईच्या पूर्व उनगरातील लाखो सभासदांना मानसिक व आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात होत असल्याने अधिकारी वर्गाचा वर्गाचाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे आजच्या काळात संस्था चालवणे कठीण झाले असून अधिकारी वर्ग नाहक त्रास देत असल्याचेही संस्थाचालक आवर्जून सांगत असतात हे निर्विवाद सत्य असल्याचे संस्था चालकाने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले
इतर वार्डाचे सहकारी निबंधकाची कार्यालये मुंबईतच आहेत त्याचप्रमाणे वरील वार्डाची सहकारी निबंधकाची कार्यालयावरून मुंबईतील संस्थाचालक अनेक वर्षापासून अन्याय सहन करत असून अनेक प्रकारचा त्रास सहन करणाऱ्या सहकारी संस्थेच्या संस्थाधारकांना सहकार चळवळीची जाणीव असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने लवकरात लवकर कोकण भवन मधील सहकारी निबंधकाची कार्यालये मुंबईमध्ये सुरू करून न्याय मिळवून द्यावा अशी ही मागणी सहकारी संस्था चालकांनी व सभासद वर्गांनी केली आहे.

.jpeg)

0 टिप्पण्या