" लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे " अशा विधानाने देखील अंगात रक्त सळसळत तो मराठा मावळा च शिवरायांचा खरा भक्त.
१९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया १५५१ रोजी शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला आणि अवघ्या महाराष्ट्राला शिवकल्याण राजा मिळाला.
जे एम एफ संस्थेत देखील शिवजयंती जल्लोषात साजरी केली करण्यात आली.
संपूर्ण शाळा, महाविद्यालय हे प्रवेशद्वारापासून ते आठ मजली इमारत तोरणे, पताका , रांगोळी ने सजवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पालखी मध्ये ठेऊन ढोल, ताशे, लेझिम ,शिवगर्जनाच्या गजरात मिरवणूक काढून जे एम एफ मंडपात विराजमान झाली.
संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ राजकुमार कोल्हे, सचिव डॉ प्रेरणा कोल्हे,वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री नाडर सर ,तसेच अतिथी म्हणून लाभलेले भारताचे शांती दुत डॉ.समीर जगे ,तसेच विरोधी पक्ष नेते व प्रवीण दरेकर व श्रीयुत देवेंद्र जी फडणवीस याचे सचिव श्री.राहुल सपकाळ, त्याच बरोबर नगरसेवक श्री.रमेश म्हात्रे, काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास करणारी व सर्वांना प्रेरित करणारी छोटीशी बालिका कु.सई पाटील उपस्थित होते.पाहुण्यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांना शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
निष्ठा, कर्तव्य, आदर सन्मान, वेळप्रसंगी गनिमी कावा ,साहसआणि दुसऱ्यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणारा असे आणि अशाप्रकारचे असंख्य गुण ज्याच्या अंगात आहेत तो सर्वगुण संपन्न राजा म्हणजेच शिवकल्याण शिवाजी राजा.अशा छत्रपतींचे थोडे जरी गुण प्रत्येकात असतील तर प्रत्येक घरात शिवबा चा च जन्म होणार असे सांगून डॉ राजकुमार कोल्हे यांनी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
प्रमुख पाहुण्यांनी देखील शिवाजी महाराजांचे चरित्र वदन करून मानाचा मुजरा केला.
ज्या मातेच्या पोटी शिवबा जन्माला आला, ज्या मातेने शिवबा ला रामायण महाभारत मधील गोष्टी सांगून संस्कार दिले ,लढवय्या बनवले अशा जिजाऊ सारखे तुम्ही सुध्धा चारित्र्यवान आणि प्रेरणादायी व्हा ,असे सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
शाळेतील सर्व मुलांनी पोवाडा, शिवगर्जना, गाणी, नृत्य , करून तसेच "जय शिवाजी , जय भवानी," जय जिजाऊ 'ची गर्जना करून जे एम एफ मंडपम ला शिवनेरी किल्ल्याचे स्वरूप आणले होते.
सर्व मुली नऊवारी साडी परिधान करून जिजाऊ च्या रुपात आल्या होत्या तर सर्व मुले मावळे बनून आले होते.
वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाच्या सर्व छात्रानी पुढाकार घेऊन शिवजयंती उत्साहात साजरी केली.
यश पाटील, सुजित गौडा, संभाजी जाधव, शुभम सोनी ,स्वप्नील जाधव, अजय शिंदे, महेश शिंदे, अनिकेत बागडे, कश्मिरा राणे, अक्षदा ठोसर, मनीष कोंडवर, यश जाधव, रवी बर्वे, रोहित पाटील, महेश गोपाळे, जुबिन, रितिका नसकर, स्वरूपा चींदलकर, ह्या वंदे मातरम् च्या सर्व माजी विद्यार्थी संघटने ने देखील कार्यक्रमात उभारी आणली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानवी व मित्रविंदा ह्या महाविद्यालयीन विद्यार्थीनीनी केले.


.jpeg)
.jpeg)

0 टिप्पण्या