कवी,पत्रकार,संपादक,गायक संतोष सावंत पुन्हा एकदा रंगभूमीवर



कवी,पत्रकार,संपादक,गायक संतोष सावंत पुन्हा एकदा रंगभूमीवर 


    ओम साई गणेश मित्र मंडळ, (रजि) महाराष्ट्र नगर, डोंबिवली पश्चिम येथील माघी गणेश जयंती निमित्त  रुई महात्म्य या दशावतार नाटकाचा प्रयोग संपन्न झाला. यावेळी या  नाटकांमध्ये लोकसत्यावाणी न्यूज यु tub चॅनेल व साप्ताहिक स्नेहसंयोग चे संपादक,पत्रकार,कवी, गीतकार,गायक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले संतोष सावंत यांनी पुन्हा एकदा एकवीस वर्षानंतर नाट्य क्षेत्रात पदार्पण केले आहे. गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या रुई महात्म्य या दशावतार नाटकात त्यांनी पार्वतीची स्त्री भूमिका साकारली होती. 




प्रेक्षकामधून या भूमिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांच्या या भूमिकेला बक्षिसांचा ही वर्षाव झाला.



    21 वर्षापूर्वी ही त्यांनी अनेक सामाजिक, कौटुंबिक अशी व्यावसायिक रंगभूमीवरील नाटके केली होती, "विच्छा माझी पुरी करा", "धरलं तर चावत सोडलं तर पळत", "भुताटकी", "फुलाला सुगंध मातीचा" अशा नाटकामध्ये त्यांची भूमिका होती. २००१ साली दुर्दशनवर एक मालवणी नाटिका सादर केली होती.त्यात ही त्यांचा सहभाग होता. त्याच प्रमाणे "योगायोग"हे नाटक त्यांनी स्वतः लिहिलेले आहे. त्यात ही  त्यांनी तिहेरी भूमिका साकारली होती. एकाच नाटकात त्यांनी तीन प्रकारच्या भूमिका साकारल्या होत्या.  

    असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व संतोष सावंत यांनी पुन्हा रंगभूमीवरील रंगदेवतेची सेवा करण्यासाठी आणि प्रेक्षकांचे निखळ मनोरंजनासाठी उतरलो आहोत. असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या