जान्हवीज मल्टी फाउंडेशनच्या वंदे मातरम् महाविद्यालय व जन गण मन शाळेच्या आवारात मोफत आरोग्य तपासणी शिबिर.


जान्हवीज मल्टी फाउंडेशनच्या वंदे मातरम् महाविद्यालय व जन गण मन शाळेच्या आवारात मोफत आरोग्य तपासणी शिबिर.

            'समाज सेवा हीच ईश्वर सेवा ' ह्याच हेतूने आज दिनांक १२ फेब्रुवारी रोजी जे एम एफ शिक्षण संस्थेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच इतरही स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आले होते.


    शासन आपल्या दारी ह्या अनुषंगाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती ,आयुष्यमान भारत कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना ,आधारकार्ड सेवा, रेशनकार्ड, त्याच बरोबर मोफत रक्त तपासणी, मधुमेह , रक्तदाब तपासणी, यासारखे अनेक महत्वाचे स्तुत्य उपक्रम राबविले गेले.

       शिबिराचे उद्घाटन डोंबिवलीच्या नगरसेविका सौ.विनिता राणे, जे एम एफ संस्थेचे अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे तसेच सचिव डॉ सौ.प्रेरणा कोल्हे यांच्या हस्ते झाले. 

           समाजाचा विकास आणि त्यांचे हित कशात आहे हे समजावून घेऊन आपणही गरजूंना मदत करावी ही भावना  कायमच आपल्याला सुख देत असते, अशा परिस्थितीत गरजूंना व सर्वसाधारण वर्गाला देखील ह्या उपक्रमाचा फायदा व्हावा ह्याच हेतूने आजचे शिबिर आयोजित केले आहे असे सांगून संस्थापक माननीय डॉ राजकुमार कोल्हे यांनी सर्व उपस्तिथाना शिबिराचा लाभ घ्यावा असे मोलाचे आवाहन व मार्गदर्शन केले.


        माननीय नगरसेविका सौ विनिता राणे यांनी सामाजिक आणि जबाबदार नागरिक म्हणून सर्वांनी ह्या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे सांगितले.

          आजच्या शिबिरात अनेक मोठे मान्यवर, तसेच मोठ्या डॉक्टरांचे पथक दाखल झाले होते.

           सामाजिक जबाबदाऱ्या, व एक जागरूक नागरिक म्हणून सतर्क राहणे आवश्यक आहे असे माननीय सचिव  डॉ प्रेरणा कोल्हे यांनी  शासनाला सहकार्य करा सांगितले.

       दिव्यांग कल्याणकारी योजना व साहित्य वाटप, उत्पन्न दाखला, प्रधानमंत्री स्वनिधी व मातृत्व योजना, के वाय सी माहिती, ज्येष्ठ नागरिक दाखला अशा प्रकारचे सर्व आवश्यक आणि गरजेचे उपक्रम शिबिरात दाखल केले होते.सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत शिबिर चालू होते.

      मोठ्या प्रमाणात साधारण पाचशेच्या वर संख्येने सर्व नागरिकांनी तसेच जन गण मन शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिबिराचा लाभ घेतला.

       सर्व पथकांना पेन भेटवस्तू देऊन कोल्हे दांपत्याने त्यांचे स्वागत केले.


   शब्दांकन .सौ श्रेया कुलकर्णी

( संगीत शिक्षिका, जन गण मन शाळा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या