राज्यातील वडार समाजाच्या प्रश्नांवर सर्वसमाज घटक पक्ष एकत्र येणार !
मुंबई- महाराष्ट्रात ५० लाखांहून अधिक असणाऱ्या वडार समाजाच्या विविध प्रश्नांवर यापुढे सर्वसमाज घटक पक्ष एकत्र येणार असून त्यासाठी लवकरच पुढील रणनिती आखली जाणार आहे,अशी घोषणा महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाच्यावतीने पुण्यातील एका महत्त्वपूर्ण बैठकीत करण्यात आली आहे.
पुण्यातील मार्केट यार्ड येथील मजुर फेडरेशनच्या सभागृहात मजूर फेडरेशनचे अध्यक्ष संजीव राजाराम कुशाळकर यांनी ही बैठक बोलावली होती.या बैठकीला महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास मोरे,वडार समाजाचे नेते दीपक शिंदे,मुकुंद पवार, भरत विटकर तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीत वडार समाजाच्या जात दाखल्यासोबतच दगड खाणीसह या समाजाचे परिवर्तन कसे करायचे, महिला,तरुणांकडे नेतृत्व देऊन विविध प्रश्नांवर व्यापक आंदोलन करून राज्य सरकारवर दबाव कसा टाकता येईल ? यासाठी सर्व समाज घटकांना सोबत घेण्याची घोषणा करण्यात आली.पुण्यातील मार्केट यार्ड येथील मजूर फेडरेशनच्या सभागृहामध्ये पार पडलेल्या या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
0 टिप्पण्या