मनोज जरांगे - पाटलांच्या उपोषणाला माथाडी कामगाराचा 'बंद ' ने पाठिंबा


मनोज जरांगे - पाटलांच्या उपोषणाला  माथाडी कामगाराचा 'बंद ' ने पाठिंबा 


नवीमुंबई - कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळण्यासाठी ८० व्या शतकामध्ये चळवळ उभी केली, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, ही चळवळ आता पुन्हा सक्षमपणे उभी रहात असून या चळवळीला व मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला तमाम माथाडी कामगारांचा भक्कम पाठींबा असून राज्य सरकारने आता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.


मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी विशेषतः मनोज जरांगे-पाटील यांच्या व महाराष्ट्रभर सुरु असलेल्या आमरण उपोषणाला तमाम माथाडी कामगारांनी मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील दिवसभर कामे बंद ठेऊन पाठींबा व्यक्त करण्यासाठी   नवी मुंबईतील माथाडी भवन येथे सभा आयोजित केली होती, या सभेला आमदार नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे बोलत होते.यावेळी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप,कार्यकर्ते सर्वश्री अजय इंगुळकर, जितेंद्र येवले, दिनकर सनुगले, बबन संकपाळ, नाना धोंडे, संभाजी बर्गे, सुरज बर्गे आदींची भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांनी केले.मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नव्यामुंबईतील पाचही मार्केट आवारातील कामे बंद ठेऊन कामगार, पालावाला महिला,मेहता कर्मचारी, वारणार,मापाडी कामगार सभेला उपस्थित होते. या सभेला युनियनचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, अॅड्. भारतीताई पाटील, राजश्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या