कोकणच्या पर्यटनासाठी ५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे - आ. दरेकरांची मागणी
मुंबई- कोकणच्या विकासासाठी पर्यटन महत्वाचे आहे. गोव्यापेक्षा पर्यटनाला जास्तीचा स्कोप कोकणच्या किनारपट्टीला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोकणच्या पर्यटनासाठी ५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली. विधानपरिषदेत पुरवणी मागणीवेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले की, या राज्याचे नेतृत्व जी मंडळी करताहेत ती राज्यातील अर्थकारणावर निष्णात अशी मंडळी आहेत. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी या राज्याचे पाच वर्ष यशस्वी नेतृत्व केले आहे. अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी ४-५ वेळा राज्याचा कारभार सांभाळला आहे. त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था कशी रहावी याचे नीट आकलन असलेली नेतृत्व या सरकारचे करताहेत. त्यामुळे चिंता कारायचे काही कारण नाही. राज्य हे संवेदनशील भावनेने चालवावे लागते. अनेक मुख्यमंत्री या राज्याला लाभले परंतु ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्यात माणूस म्हणून संवेदना आहेत त्यावेळी पैशाचा विचार न करता सर्वसामान्यांसाठी सरकार म्हणून जेजे करावे लागेल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न झालेला दिसून येतो. मागील मार्चचा अर्थसंकल्प पाहिला तर शोषित, उपेक्षित, वंचित घटक आहे त्यांच्यासाठी 'पंचामृत' बजेट सादर केले. त्यांना न्याय देण्याचे काम तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचेही दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले की, आपला देश जगात दहावी अर्थव्यवस्था म्हणून काम करत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. हे आपल्यासाठी भूषणावह आहे. पंतप्रधान मोदी देशाची अर्थव्यवस्था पाचावरून तीनवर आणण्याचा प्रयत्न करत आहेत ह्यात महाराष्ट्राचा मोठा हिस्सा असणार आहे. याची जाणीव आमच्या सरकारला निश्चितपणे आहे.
कोकणात दरडी कोसळण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. माळीण, तळीये दुर्घटनेत अनेक मृत्यूमुखी झाले. नुकतीच इर्शाळवाडीची घटना घडली. या घटना दरवर्षी घडताहेत.सरकार कुणाचेही असो नैसर्गिक आपत्ती येते त्या संकटाला आपण सामोरे जातोय. उपाययोजनाही करतोय परंतु ज्या दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे दुर्दैवाने त्याला गती मिळत नाही. दरड कोसळली आपत्ती झाली की आपण त्या आपत्तीग्रस्तांच्या नातेवाईकांना शाळेत, मंगलकार्यालयात स्थलांतरित, पुनर्वसन करतो. सरकारने कोकणात कायमस्वरूपी आपत्ती निवारण केंद्रे निर्माण करावी, या मागणीचा पुनःरुच्चारही दरेकर यांनी केला.
यावेळी हौसिंगवर बोलताना दरेकर म्हणाले की, जे अधिकारी आहेत त्यांच्या कामाला जी गती यायला पाहिजे, गांभीर्य यायला पाहिजे ते येताना दिसत नाही. मुंबईत गृहनिर्माण संस्थांची परिषद घेतली. १५ ते २० हजार प्रतिनिधी होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. १५ वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा झाल्या. किती महिने झाले. चीफ सेक्रेटरीना सांगितले १५ घोषणाचे जीआर काढा. आज या १५ विषयांपैकी केवळ ३ जीआर निघाले. आमचे उपमुख्यमंत्री मुंबईकरांना आणि हौसींग मधील लोकांना विश्वास देणार मात्र हे झारीतले शुक्रचार्य अधिकारी अंमलबजावणी करणार नसतील तर नावं कुणाचे खराब होते. वलसा नायर यांचे अभिनंदन करतो. त्यांनी इंटरेस्ट घेऊन हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. परंतु इतर डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत त्यांनी जीआर काढले नाहीत. जे अधिकारी कामात दिरंगाई करतात त्यांच्यावर कारवाईची आवश्यकता आहे. जे वाढीव सेवाशुल्क जाहीर केले आहे त्यासाठी तरतूद करावी. तसेच जे आदेश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिले आहेत त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या सचिव व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणीही दरेकर यांनी केली.
कोकणच्या विकासासाठी पर्यटन महत्वाचे आहे.परंतु कोकणचा पर्यटनाच्या दृष्टीने एकात्मिक विकास करण्याऐवजी थातूर मातुर मदत जी सरकारे असतात ती करतात. कोकणासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन म्हणून जाहीर केला आहे. रायगड जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटनाचा विकास बनवला गेला. परंतु तेथे मोठ्या प्रमाणावर पर्यटनाच्या माध्यमातून कोकणची अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने विकसित झाली पाहिजे होती ती होऊ शकली नाही. कोकणच्या पर्यटनासाठी शासनाने ५ हजार कोटीचे पॅकेज जाहीर करावे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे टुरिझम करावे. गोव्यापेक्षा टुरिझमला जास्तीचा स्कोप कोकणच्या किनारपट्टीला आहे. भरीव पॅकेज देऊन कोकणचा इन्टिंग्रेड टुरिझम करावा, अशी मागणी दरेकर यांनी केली.
**********************
*रायगडचे बंद मिलिटरी*
*स्कूल पुन्हा सुरू करावे*
दरेकर म्हणाले की, सैनिकी शाळा अत्यंत महत्वाच्या आहेत. प्रभाकर कुंटे यांनी रायगडला मिलिटरी शाळा स्थापन केली. पण ते बंद आहे. ती शाळा का बंद आहे? त्याच्या अडचणी काय? याची माहिती घेऊन ते पुन्हा सुरू करावे.
**********************
*अभिषेक विजय सुर्वे
0 टिप्पण्या