कारगिल विजय दिनानिमित्त सेवानिवृत्त जवानांचा सन्मान





प्रतिनिधी (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख : 


कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने दिनांक २६ जुलै रोजी नेरुळ मधील आर्मी वसाहतीमध्ये मा. नगरसेवक तथा सभागृह नेते रवींद्र इथापे यांच्या पुढाकाराने कारगिल युद्धात सहभागी झालेले तसेच निवृत्त ब्रिगेडियर, कर्नल,  मेजर,  कमांडर, स्वातंत्र्य सैनिक यांचा सत्कार, माजी खासदार संजीवजी नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.


याप्रसंगी ब्रिगेडियर धरमप्रकाश, ब्रिगेडियर श्री.  माथुर, कमांडर श्री. देव वर्मा, कमांडर जे.एल मन, कर्नल यशपाल कलजा, कॅप्टन रवि अय्यर, कॅप्टन सेक्युरिया, मा.नगरसेवक सुरेश शेट्टी, मा.नगरसेवक सुनिल पाटील, आर्मी सोसायटीचे चेअरमन व्ही. एल.शंकर, श्री. द्वारकानाथ, आशिष अगरवाल, नितीन नाईक, रविंद्र सिंग, श्रीमती शामला एस्., हिना कासम,  विजय साधवाणी, अतुल पांडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या