नक्षत्राचं देणं काव्यमंच, भोसरी पुणे ३९ तर्फे दरवर्षी कवींच्या काव्य लेखणीला धार मिळण्यासाठी राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा आयोजित केली जाते .कवींना निसर्ग स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच श्रावण व निसर्ग या विषयावर कवींनी दोन कविता पाठवाव्या. नि:शुल्क ही स्पर्धा आहे .२४ व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धेतून निवडलेल्या कवितांना व विजेत्यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह सन्मानपत्र गुलाबपुष्प श्रीफळ देऊन भव्यसमारंभ पूर्वक सन्मानित करण्यात येते. दरवर्षी या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळत आला आहे. सलग या स्पर्धेचे हे २४ वे वर्ष आहे. प्रत्येक सहभागीना सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात येणार आहे .याप्रसंगी श्रावणी काव्य मैफल सुद्धा संपन्न होत आहे. कवींनी आपल्या कविता दि.३० ऑगस्ट २०२३ अखेरपर्यंत पुढील पत्त्यावर पोस्टाने पाठवाव्या. कवींनी आपला पत्ता मोबाईल पिनकोड सर कविता पाठवाव्या.
कविता पाठवण्याचा पत्ता- प्रा राजेंद्र दशरथ सोनवणे
अध्यक्ष नक्षत्राचं देणं काव्यमंच
साई सदन ,ए/3 महालक्ष्मी हाईट्स, भोसरी ,पुणे-४११०३९. आतापर्यंत काव्यमंचने सात अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलन, ९५ काव्यसंग्रह प्रकाशन ,हजारो काव्यमैफली ,शेकडो काव्यबैठका, कार्यशाळा ,काव्य सहलींचे आयोजन केले आहे. कवींना आदर व सन्मान मिळावे म्हणून या काव्यमंचची स्थापना करण्यात आलेली आहे .काव्यमंचच्या संपूर्ण महाराष्ट्रात शाखा कार्यरत आहे. असे प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
आपला काव्यप्रेमी
प्रा.राजेंद्र सोनवणे
संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष
नक्षत्राचं देणं काव्यमंच
0 टिप्पण्या