चेंबूरकर महापालिका मंडईतील मासेविक्रेत्या महिलांची ससेहोलपट


 माजी नगरसेविका आशा मराठे यांचा आंदोलनाचा इशारा 


मुंबई - चेंबूर नाका येथील कै.भाऊराव हरिश्चंद्र चेंबूरकर  महापालिका मंडईतील    सोयी सुविधांचा ऐन पावसाळ्यात बोजवारा उडाल्याने याठिकाणचे मटण- मासे विक्रेते आणि कोळी भगिनींची अक्षरशः ससेहोलपट सुरू आहे.जुनी मंडई तोडल्याने तात्पुरत्या बांधलेल्या शेडची दुरवस्था  झाली असूनही पालिकेने मात्र मासिक भाड्यासाठी तगादा लावलाआहे.तरी पालिकेने ही मंडईची दुरवस्था दूर करून भाडे वसुलीला स्थगिती द्यावी, अन्यथा कोळी बांधव भगिनींसह तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा माजी नगरसेविका आशाताई मराठे यांनी पालिका आयुक्तांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.




पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना माजी नगरसेविका आशा मराठे यांनी निवेदनात म्हटले आहे की,पालिकेच्या चेंबूर मधील या मंडई इमारतीचे पुनर्विकास काम सुरू आहे. त्यामुळे येथील मासे विक्रेत्यांसाठी पालिकेने प्लास्टिक पेपर टाकून हंगामी शेड उभारले आहे. मात्र वादळी वार्‍यात शेडचे प्लास्टिक उडून गेले आहे. प्लास्टिक उडून गेल्याने मटण-मासे विक्रेत्यांना भर पावसात केवळ छत्रीचा आधार घरून आपला व्यावसाय करावा लागत आहे.उन्हाळ्यात ऊन आणि आता पावसाळ्यात मुसळधार पावसाचा मारा सहन  करावा लागत आहे.


त्यातच डोक्यावर छत नसताना पालिका प्रशासनाने  हजारो रुपये दंडासह सक्तीने भाडे वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे इथल्या कोळी भगिनींची अवस्था  अत्यंत बिकट झाली आहे.

तरी पालिकेने या मंडईच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत या मासे विक्रेत्या कोळी भगिनींसाठी पक्के शेड बांधुन त्यात विज,पाणी साफसफाई आदी सुविधा  उपलब्ध करून द्याव्या आणि  भाडे वसुलीस स्थगिती द्यावी,अन्यथा या कोळी भगिनींसह तीव्र आंदोलन आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही आशा मराठे यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या