एक हात मदतीचा शानदार पुरस्कार सोहळा ठाण्यात संपन्न !


नुकताच ठाणे येथे रविवार दि:- १९ मार्च २०२३ रोजी सकाळी, कै. वा. अ. रेगे सभागृहात मराठी ग्रंथ संग्रहालय मध्ये "एक हात मदतीचा सामाजिक संस्था" च्या वतीने 'महाराष्ट्र भूषण व समाज रत्न' पुरस्कार सोहळ्यात मा. श्री रविंद्र मोरे साहेब (म.न.से. ठाणे शहर अध्यक्ष), मा. श्री भास्कर चव्हाण साहेब (संस्थापक अध्यक्ष), मा. निलेश चव्हाण साहेब (माथाडी कामगार अध्यक्ष ठाणे), श्रीमती हेमलता मनोज चौधरी मॅडम (चर्मकार ब्रिगेड महाराष्ट्र- महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा) मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून, राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रमाता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंचावर उपस्थित मान्यवरांचे शाल घालून, पुष्पगुच्छ देऊन, स्वागत करण्यात आले. शब्दश्री विलास देवळेकर यांनी संस्थेच्या नावावर स्वरचित कविता सादर केली. 

     मंचावर उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन पर भाषणं झाली. त्या नंतर महाराष्ट्रातील अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी कार्य करणाऱ्यांना निवडक  सन्मानिर्थांना पुष्पगुच्छ- तुळशीचे रोप- सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन, मान्यवरांच्या हस्ते "महाराष्ट्र भूषण व समाज रत्न पुरस्काराने" गौरविण्यात आले. 

      आणि ह्या कार्यक्रमाचे आयोजक श्री भास्कर चव्हाण यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या