कवी. परशुराम नेहे एक वादळ.......




समाज व्यवस्थेबद्दल आपल्या लेखणीतून चीड व्यक्त करणारे आणि शोषितांच्या दुःखाला आपलं दुःख मानणारे ज्यांची लेखणी चौफेर मुसाफिर करते आहे ,आणि ज्यांनी मराठी साहित्यात आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे, असे आमचे स्नेही पुरोगामी विचारसरणीचे जेष्ठ साहित्यिक कविवर्य. परशुराम निहे यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्राला सुपरीचीत आहे अनेक सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक संस्थांमध्ये कवी परशुराम नेहे हे कार्यरत आहेत मग त्या मुंबई ठाण्यातील असोत किंवा गावाकडील असोत खरं म्हणजे त्यांचा एक पाय मुंबईत तर दुसरा पाय गावाकडच्या मातीत अजूनही भरभक्कम आहे त्यांना अनेक सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक पुरस्कार लाभलेले आहेत कवितेचे सादरीकरण आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यात त्यांचा हातखंडा आहे त्यांच्या कवितेमधील आणि लेखांमधील विचार वाचकांना प्रेरणा देऊन जातात त्यांच्या एकूणच साहित्यामध्ये एक जिवंतपणा जाणवतो हलक्या फुलक्या संवादात्मक भाषेत ते वाचकांशी संवाद साधतात कवी. परशुराम नेहे म्हणजे सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व ,आपलं जीवन संघर्षमय असलं तरी समाजाच्या दृष्टीने ते आदर्शवत आहे, समाजात तुम्हाला आदराचं स्थान आहे, कवी परशुराम नेहे खऱ्या अर्थानं दूरदृष्टीचे कवी आहेत ते स्वतःसाठी जगता जगता समाजासाठी जगतात ही गोष्ट मला फार उल्लेखनीय आणि मोलाची आहे असे वाटते ,आपल्याला विचारानं 

 आणि कर्तुत्वान समृद्ध व्हायचं असेल तर समाजभान असलच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे कवी. परशुराम नेहे यांना माणसाची खूप आवड आहे आणि म्हणून ते नेहमीच माणसांच्या गराडयात असतात, माणसं कमावणे ही एक कला आहे आणि ती कवी. परशुराम नेहे यांना अंगभूत आहे हे मात्र नक्की कवी म्हणून ते ग्रेट आहेतच परंतु माणूस म्हणून ते आणखीनच ग्रेट आहेत कविवर्य परशुराम नेहे यांना अनेक साहित्यिक पुरस्कार लाभलेले आहेत आणि हल्लीच त्यांना अहिल्यादेवी होळकर जीवनगौरव पुरस्काराने  सन्मानित केले आहे ,या पुरस्कारामुळे आनंद तर आहेच पण त्यांच्या जबाबदारीतही वाढ झालेली आहे .कोरोनाच्या भयंकर संकटाने जगभर थैमान घातले असताना माणसाचं माणूसपण पणाला लागलेले असताना सर्व दूर फक्त अंधारच पसरलेला असताना हा अवलिया मात्र साहित्यिक कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटीसाठी भेटीगाठीच्या निमित्ताने स्वतःला व्यग्र ठेवतो आहे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे असे मी मानतो ,निसर्गाशी नातं सांगणारा हा कवी शेताच्या बांधावर बसून साऱ्या शिवाराला आपली कविता ऐकवतो त्याच्या कवितेतील शब्द आणि शब्द अस्सल गावच्या मातीतला आहे मनाचा तळ शोधण्याचा अतिशय खडतर प्रयत्न कवी परशुराम नेहे आपल्या कवितेमधून करताना आपल्याला दिसतात इथं मला काही कवितेच्या ओळी आठवतात ,,काळ जरासा अवघड आहे हल्ली ,काळ सुखाचा आठवणारा आहे खूप तापली वाळू  पायाखाली, पण मनात ओढा खळखळणारा आहे. आपण असेच खळखळत रहा, कवितेच्या झडू देत मैफली ,माणसाने माणसाची होऊ देत सावली

 आपल्याला पुढील सामाजिक आणि साहित्यिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

     

       कवी . सुदेश जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या