राहुल गांधी सोबत 'भारत जोडो यात्रा' मध्ये सामील झाला जनतेचा प्रचंड मोठा जनसागर..
प्रतिनिधी: अवधुत सावंत
राहुल गांधी यांची 'भारत जोडो पदयात्रा' नांदेड जिल्ह्यातून निघून हिंगोली जिल्ह्याच्या प्रवेशद्वारापाशी आली त्यावेळेस जनतेचा प्रचंड मोठा जनसागर या यात्रेत सामील झाला होता. आदित्य ठाकरे यांनी भारत जोडो पदयात्रेमध्ये सहभागी होऊन राहुल गांधी यांची गळाभेट घेऊन शिवसेनेचा भारत जोडो यात्रेला पूर्णपणे पाठिंबा आहे हे उपस्थितांना दर्शविले. राहुल गांधी यांची काल सकाळी सहा वाजल्यापासून पदयात्रा हिंगोली जिल्ह्याच्या दिशेने सुरू झाली होती. या पदयात्रेत ज्या जिल्ह्यातून राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा जाऊ शकत नाही. त्या त्या आजूबाजूच्या जिल्ह्यातून पदयात्रेचे स्वागत करण्यासाठी पदयात्रेमध्ये सहभागी होण्याकरता लाखोंच्या संख्येने लोक सहभागी होत होते.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानाला प्रतिसाद देण्याकरता हजारोंच्या संख्येने वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोंढे येत असताना दिसत होते. लातूर हा मराठवाड्यातील एक भाग असल्याने लातूरमधूनही हजारो कार्यकर्ते या पदयात्रेसाठी येताना दिसत होते. नांदेड वरून हिंगोली येथे प्रवेश करत असताना त्या ठिकाणी भारत यात्रेचे भव्य प्रवेशद्वार उभे करण्यात आले होते. बहुतांशी लोकांनीं आपल्या पारंपारिक कला सादर करून राहुल गांधीचे स्वागत केले .कला पथके हि आपली पारंपारिक कला सादर करत होते.
कलापथकांना विचारल्यानंतर तुम्हाला कोणी बोलवले व का असे विचारले, तरीही त्यांनी सांगितले आम्ही स्वत: होऊन या भारत जोडोचे स्वागत करण्यासाठी आलेलो आहोत. राहुल गांधी यांची सर्वसामान्य माणसाबद्दलची तळमळ आम्हाला दिसत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य संगीत लोककला सादर करणारे दिसत होते. जनतेचा जो अफाट जनसागर लोटला होता हा जनसागर कोणत्त्यांयाही आमिषाला बळी पडून आला नव्हता. तर तो आपल्या देशाच्या प्रेमासाठी येथे आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रत्येकाला विचारल्यानंतर त्यांच्यामध्ये एकच भावना होती की 'जो आम्हाला तारू शकतो असा हा आमचा नेता पायी येतोय, त्याच्या हाकेला साद देणे, त्याला प्रतिसाद देण्याची सर्वत्र भावना दिसत होती.
हिंगोलीच्या प्रवेशद्वारापासूनच महाराष्ट्रातील आघाडी सरकारमधील शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे हिंगोली पासून सहभागी झाले आणि या दोघांची गळाभेट झाली. राहुल गांधी व आदित्य ठाकरे यांची गळाभेट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. आणि आता आपल्या देशातील तरुण जागा झाला आहे यातून दिसून येत होते.
लाखोच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा मार्गावरती प्रचंड गर्दिचे लोंढे दिसत होते. खेड्यापाड्यातून आलेले असंख्य लोकं दिसत होती. आणि ह्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे हे देखील जाणवले. त्याच बरोबर या भारत जोडो यात्रेत स्वखुशीने सर्वच वयोगटातील लोक सहभागी झाले आहे हे विशेष आहे.
0 टिप्पण्या