रविवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबईतील धारावीत, श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूल मध्ये श्री दत्ता खंदारे संपादित 'भगवे वादळ' ह्या साप्ताहिक वृत्तपत्राच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळ्यात अवघ्या महाराष्ट्रातून सामाजिक कार्यकर्ते- डॉ- साहित्यिक व कवी आणि पत्रकार यांना वेगवेगळ्या नावाने पुरस्कार देऊन, गौरविण्यात आले.
श्री अभिजीत राणे (कामगार नेते)
श्री प्रफुल्ल फडके (संपादक दै. मुंबई चौफेर)
श्री अ ना रसनकुटे (अध्यक्ष कोकण प्रदेश, अ भा. म सा प. पुणे)
श्री दादासाहेब शिंदे (दलित मित्र, जेष्ठ पत्रकार)
डॉ प्रविण निचत (होप फाऊंडेशन)
श्री राजेश खंदारे (समाज सेवक)
श्री रमेश कदम :(समाज सेवक)
आणि सौ. स्नेहलताई आंबेकर (मा. महापौर नगरसेवक) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी सुरवातीला शब्दश्री विलास देवळेकर यांनी अर्धा तासांपेक्षा जास्त वेळ "कविता- राशी- भविष्य- गझल आणि आरती" अशा वेगवेगळ्या काव्य प्रकार सादर केले. त्या नंतर इतर कवींनी ही आप आपल्या रचना सादर केल्या. त्यांच्या साहित्याची दखल घेऊन, शब्दश्री विलास देवळेकर यांनाही "साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार- २०२२" जेष्ठ साहित्यिक डॉ अ ना रसनकुटे यांच्या हस्ते 'स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र' देऊन गौरविण्यात आले.
तसेच कवी देवळेकर लिखित "प्रथम वर्धापन दिनानिमित्त !! ह्या शुभेच्छा कवितेचा ६ फुट फ्लॅक्स प्रवेश द्वार जवळ लावण्यात आले होते. तेथे मान्यवर आणि उपस्थितांनी उभे राहून फोटो काढले, जणू प्रथम वर्धापन साप्ताहिक भगवे वादळ दिनाला शुभेच्छा दिल्या आहेत.
आणि ह्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन पत्रकार श्री शशिकांत सावंत यांनी केले. तसेच उत्तम नियोजन करण्यात आले होते.
0 टिप्पण्या