मला भावलेले कवी वादळकार या विशेषांकाचे उद्योजक रामदास माने यांच्या शुभहस्ते प्रकाशन-



नक्षञाचं देणं काव्यमंचवतीने उद्यान प्रसाद कार्यालय,सदाशिव पेठ,पुणे येथे नुकतेच सुप्रसिदध उद्योजक रामदास माने यांच्या शुभहस्ते "मला भावलेले कवी वादळकार" या विशेषांकाचे प्रकाशन संपन्न झाले.

     यावेळी महाराष्टाचे सुप्रसिदध कवी वादळकारांचा पन्नासावा वाढदिवस सोहळा दिमाखात संपन्न झाला.त्या वाढदिवसानिमित्त या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित प्रकाशन करण्यात आले.

       यावेळी "प्रेम क्लिनिक" या प्रेम कवितांच्या थिएटर शो चे सादरीकरण कवी वादळकार यांनी केले.प्रेम कवितांचा आविष्कार रसिकांची मने जिंकणारा ठरला.

         यावेळी कार्यक्रमाचेअध्यक्ष माने ग्रुप आॅफ कंपनीचे चेअरमन रामदास माने म्हणाले की,"एखाद्या व्यक्तीचा जीवनप्रवास आपणाला प्रेरणा देत असतो.प्रा.राजेंद्र सोनवणे उर्फ कवी वादळकारांनी केलेला हा पन्नास वर्षांचा  झंझावाती आयुष्याचा प्रवास सर्वांना प्रेरणा देणारा आहे.नक्षञाचं देणं काव्यमंच,साई कला आविष्कार नाट्य संस्था,जुन्नर तालुका मिञ मंडळ(पुणे),साईराजे टूर्स हाॅलीडेज,साईराजे पब्लिकेशन या  संस्थाची जबाबदारी सांभाळत,संसाराची धुरा संभाळत,सर्व सहका-यांना सोबत  घेऊन जाणे.गेली २५ वर्षे हे प्रभावीपणे कार्य करत आहे.समाज्याचे आपण देणे लागतो.या सर्पित भावनेने कार्य करणारा हा समाजाचा हिरा आहे.त्यांच्या पुढील आयुष्याला मनापासुन शुभेच्छा देत आहे."


यावेळी बोल्ड कवी म.भा.चव्हाण यांनी प्रा.राजेंद्र सोनवणे,सौ.प्रीती सोनवणे,चि.साईराजे सोनवणे या कुटुंबाचा पुष्पगुच्छ,शाल देऊन याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

    यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातुन प्रा.राजेंद्र सोनवणेच्या कार्याचे गौरवउदगार व्यक्त केले.

    यावेळी कार्यक्रम अध्यक्ष उद्योजक रामदास माने,प्रमुख पाहुणे कवी म.भा.चव्हाण,चिञकार सुहास चव्हाण,गुणवंत कामगार प्रभाकर ढोमसे,युवा उद्योजक योगेश आमले,कायदेतज्ञ अॅड.जयराम तांबे,मेजर गजानन सोनवणे,कवी रामचंद्र पंडीत,राजज्योतीषतज्ञ शंकरकुमार ,बाळासाहेब आल्हाट,सुहास तांबे,विद्याधर ढोमसे,सौ.वैशाली महाबरे,कवी जयवंत भुजबळ,अमोल देशपांडे,अॅड.संतोष काशिद,यशवंत गायकवाड,सौ.अनिता बिराजदार,ताईबाई सोनवणे,संजय देशमुख,मिनिनाथ सोनवणे,मोहन कुदळे, सौ.आरती गायकवाड,निखिल खोल्लम,अनंत देशपांडे,शरद येंधे,सौ.ताराबाई सोनवणे,भीमराव गायकवाड,सौ.पुनम सोनवणे,सौ.अश्विनी देशपांडे,अशोक सोनवणे,आनंद मुळूक,प्रकाश पाटील,विराज सोनवणे,सौ.रेखा खोल्लम,सोहम खोल्लम,इ.अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

        या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी केले.बहारदार सूञसांचालन सौ.प्रीती सोनवणे तसेच आभार प्रदर्शन उल्हास पानसरे यांनी मानले.चार तासांचा हा सोहळा सर्वांना आनंद देणारा ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या