वयाच्या 72 व्या वर्षांत शतकपूर्ती पुरस्काराकडे वाटचाल



ज्यांचे जन्म स्थान सिधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या गावातील असून सध्या डोंबिवली पश्चिम कडील जुनी डोंबिवली येथे वास्तव्यास असलेले मनमिळाऊ,शांत स्वभावाचे,अध्यात्माचा गाढा अभ्यास असलेले, भक्त्तीत रमणारे व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे म्हणजेच शशिकांत सावंत हे होय, 10 नोव्हेंबर रोजी वयाच्या 73 व्या वर्षात त्यांनी पदार्पण केले आहे, यांची अनेक वृतपत्रांत्तून समजउपयोगी पत्रे प्रकाशित झालेली आहेत. समाजातील समस्यांचे पत्रलेखना द्वारे त्यांनी दैनिक, साप्ताहिक मासिकांतून वाचा फोडलेली आहे त्यांनि कवीताही लिहिलेल्या आहेत.

सामाजिक क्षेत्रातील काम पाहता आता पर्यंत त्यांना अनेक संस्थानी पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे, त्यांच्या नावावर एकूण आतापर्यंत 90 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत 


ते अनेक संस्थामध्ये ते कार्यरतही आहेत.

१) महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ, मुंबई- कार्यकारिणी सदस्य 

२) मुंबई वृत्तपत्र लेखक संघ मुंबई- सल्लागार

३) रत्नागिरी जिल्हा नवोदित साहित्यिक संघ मुंबई- सचिव

४) नवचैतन्य सामाजिक विकास संस्था डोंबिवली- कार्याध्यक्ष

५) अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे/ मुंबई/ ठाणे/ कल्याण/ डोंबिवली महानगर- मुंबई प्रदेश संघटक 

साप्ताहिक स्नेहसंयोग मध्ये ही ते कार्यरत आहेत




असे हे चिरतारुण्य व्यक्तीमत्व लाभलेले अष्टपैलू व्यक्तीमत्व समाजसेवक, पत्रकार,कवी व वृत्तपत्र लेखक असे व्यक्तमत्व म्हणजे सन्माननीय शशिकांत सावंत हे होय. ते शतायुषी व्हावेत अशी  लोकसत्यवाणी न्युजच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या