साहित्यिक जगदेव भटू यांच्या 'गाठोडे' कादंबरीचे प्रकाशन





भिवंडी तालुक्यातील शेलार येथे राहणारे ज्येष्ठ साहित्यिक जगदेव भटू यांच्या  'गाठोडे' कादंबरीचे प्रकाशन नूकतूच धुळे येथे पार पडले

६० वे अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलन धुळे संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पापालाल पवार , व साहित्यिक  प्रा.राम जाधव, साहित्यिक दत्तात्रय कल्याणकर,  डॉ.प्रतिभाताई चौरे, अंकुर संघाचे केंद्रीय अध्यक्ष मा.हिम्मतराव ढाळे, तसेच रेखाताई मुंदडा, प्रकाश धादगिने. प्रा. मोहन काळे आदी  मान्यवरांच्या हस्ते अंकुर साहित्य संघाचे ६० वे अखिल भारतीय साहित्य सम्मेलनात  करण्यात आले.


गाठोडे' कादंबरीचे लेखक जगदेव भटू असून हे पुस्तक ११० पानांचं आहे. मुंबई ते जन्मू काश्मीर पर्यंत प्रेमावर आधारित प्रवासाचे वर्णन या कांदबरीत तुम्हाला वाचायला मिळेल. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील हे  त्याचे चौथे पुस्तक आहे. या आधी त्यांचे मशाल कविता संग्रह, द्वितीय बौद्ध शासन ओ बी सी बौध्द धम्माच्या वाटेवर तसेच तिमिरातून तेजाकडे कथासंग्रह प्रकाशित आले आहेत.

 'गाठोडे' कादंबरीचे प्रकाशन झाल्यानंतर साहित्यिकांनी लेखक जगदेव भटू यांचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा.शुक्राचार्य गायकवाड , प्रा. बी अनिल भालेराव कवी विजयकुमार भोईर कवी प्रज्ञेश सोनावणे, पत्रकार युवा कवी मिलिंद जाधव एम. के. वाघ भास्कर अमृत सागर कवी नवनाथ रणखांबे शाम बैसाणे कवी संतोष सावंत यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या