प्रतिनिधी: अवधुत सावंत
दिल्ली महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सुनावणी आता किमान चार आठवडे लांबणीवर पडली असून ती २९ नोव्हेंबर नंतर होईल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.
आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाकडे दोन्ही बाजूच्या वकिलांनी एकत्रित सुनावणीचे मुद्दे सादर करण्यासाठी तीन आठवड्याची मुदत मागितली होती.
त्याआधी कोर्टाने दोन्ही बाजूने एकत्रित बसून सुनावणीचे मुद्दे काढण्यास सांगितले होते. त्यानंतर दोन्ही बाजूने वेळ मागण्यात आला होता.
सुप्रीम कोर्टाने २९ नोव्हेंबर पर्यंत हा अवधी दिला आहे. तोपर्यंत एकत्रित मुद्दे कोर्टासमोर सादर होतील आणि त्यानंतर पुढील सुनावणीची तारीख न्यायालय निश्चित करेल, त्यामुळे ही सुनावणी आता पुढील महिन्यात नाताळ सुट्टी आधी होते की नंतर ते पाहावे लागेल.
0 टिप्पण्या