बेस्ट प्रशासनाचा आयकर कर्मचारींवर अन्याय !



(विलास देवळेकर)

दोन वर्षांनी बांद्रा रेल्वे स्थानकावरुन बसेस चालू झाल्यात. सकाळी सकाळी, कामावर जाणाऱ्यांची घाई असते. पावसाळ्यात रेल्वे ही उशिरा असतात. त्यामुळे कमी बसेस मुळे महिला- पुरुष- विद्यार्थी- वृद्ध  तसेच काही कामानिमित्त आलेले नवीन प्रवासी, यांचेही भरपूर प्रमाणात हाल होत आहेत. त्यातील काही प्रवासी रिक्षाने नाईलाजाने जातात. 

      दुसरं महत्त्वाचे म्हणजे, डायमंड मार्केटला बसेसचं इतकं महत्त्व प्राप्त झाले आहे की, आम्ही ३ नंबर बसेस साठी बस थांब्यावर रांगेत असताना, अर्धा तास नंतर ३ नंबर बस येते. पण तेवढ्या अवधीत डायमंड मार्केटसाठी, ५ ऐ सी, ७ छोट्या आणि ५ मोठ्या बसेस पाठवल्या जातात. आणि आमच्या ३नं. मार्गावर, बॅंक क्षेत्रातील मोठ मोठे कार्यालय, क्रिकेट क्लबचे कार्यालय, जिओ वर्ड सेंटरचे मोठे कार्यालय, सी ऐ चे विद्यार्थीचे कार्यालय, अमेरिकन व्हिसाचे कार्यालय, विदेश भवनचे कार्यालय, आणि आयकर विभाग कौटिल्य भवनचे कार्यालय आहे. एका अर्थाने मराठी माणसांवर मात्र अन्याय होत आहे. फक्त डायमंड मार्केटवाले काय देशासाठी काम करत आहे का ? आणि या मार्गावरील कार्यालयातील कर्मचारी काय टाईमपास साठी कामावर येतात का ?  आम्हा प्रवाशांची दखल कोणी घेणार आहे का ? कुर्ला रेल्वे बस आगारात सुद्धा २ नंबर बस अर्धा तासानंतर येत आहे. त्यामुळे तिथेही गर्दी वाढत आहे. 

      तिसरी गोष्ट, बरं सकाळी सकाळी बांद्रा रेल्वे स्थानकावरुन ती थेट बांद्रा बस आगारात, बस चालक व वाहक बदलण्यासाठी जाते. त्यात पुन्हा १५ मिनिटे जातात. गप्प बसून सहन करावे लागते. नाही तर, अजून उशीर होईल. आणि सायं ४-३० नंतर बस रेल्वे स्थानकाजवळ न जाता, बस आगारात जाते. म्हणजे पावसाळ्यात, महिला पुरुष विद्यार्थी आणि वृद्धांनी चालत जावा. हि मुंबई आहे का खेडेगाव आहे  ? हेच कळत नाही. आणि ५ वाजता महिला विशेष बस येणार. ५ नंतर महिला कर्मचारी कार्यालयात नसतात का ? महिलांच्या सुरक्षेसाठी हा कोणता नियम आहे ? हेच कळत नाही. आणि त्या नंतर, पुन्हा अर्धा तासानंतर सामान्य बस येणार. तो पर्यंत पुन्हा गर्दी गोंधळ. आणि पुढच्या सर्व बस थांब्यावरील प्रवासीला चढायला मिळत नाही. महिला व पुरुष, सर्व वयोगटातील प्रवाशांचे हाल होत आहेत. सायं ७ नंतर हिच ३नं. बस, रेल्वे स्थानकपर्यंत प्रवाशांना सोडते. ह्या नियमांना काय म्हणावे ? त्यामुळे सर्वंच प्रवाशी नाराज झाले आहेत. 

      आणि सी ऐ च्या कार्यालया जवळ शेवटचा थांबा आहे. तिथे पावसाळ्यात किंवा इतर वेळी बस चालकांस विनंती केली की, आपण बस फुटपाथच्या जवळ लावा, जेणेकरून बस मध्ये चढायला आणि उतरायला सर्व प्रवाशांना सुलभ होईल. सुचना देऊनही चालक व वाहक यांना माणुसकी तर नाहीच, पण उद्धटपणा जास्त आहे. 

      कृपया, ह्या वृत्त पत्रकाच्या माध्यमातून बेस्ट प्रशासनाने, आमची बस नंबर २व३ नंबर बसेसची दखल घ्यावी, तेवढीच मापक विनंती करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या