दहीहंडीसाठी १० थर लावणार्‍यांवर पोलिसांत तक्रार दाखल करणार ज्येष्ठ समाजसेविका स्वाती पाटील यांचा जाहीर इशारा

 दहीहंडीसाठी १० थर लावणार्‍यांवर पोलिसांत तक्रार दाखल करणार ज्येष्ठ समाजसेविका स्वाती पाटील यांचा जाहीर इशारा 



मुंबई  -  दोन वर्षांनंतर यंदाची दहीहंडी निर्बंधमुक्त साजरी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळे गोविंदांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.मात्र सर्व गोविंदा पथकांनी कमी उंचीचे थर लावावेत कारण संविधानाच्या कलम २१ प्रमाणे कोणात्याही व्यक्तीचा जीव धोक्यात टाकणे हा कायद्याने गुन्हा आहे.त्यामुळे  आयोजक,संयोजक आणि १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकांविरोधात तक्रार दाखल करण्यात येईल,असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां आणि लोकजागृती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा स्वाती पाटील यांनी दिला आहे.

 

मुख्यमंत्र्यानी यंदाची दहीहंडी निर्बंधमुक्त साजरी करण्याचे जाहीर केले असले तरी ह्या सणासाठी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे सर्व नियम लागू होतात.त्यामुळे सर्वांनी हे नियम पाळून दहीहंडी साजरी करायची आहे.अजूनही सरकारकडून थरांच्या उंचीवर कोणतेही निर्बंध ठेवण्यात आलेले नाहीत.गेल्या दोन वर्षापासून थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे दहीहंडीत जीव गेल्याने आपल्या कुटूंबावर भार पडेल ही जाणीव गोविंदाने ठेवली पाहिजे.त्यामुळे आपल्या गल्लीबोळातच कमी उंचीचे थर बांधून दहीहंडी साजरी करावी. ज्या ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होईल त्याठिकाणच्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येणार आहे, असा इशारा समाजसेविका स्वाती पाटील यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या