स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांकरिता जमा संग्रहण कॅम्प
दिनांक ०६/०८/२०२२ रोजी मुम्ब्रा येथील प्रतिष्ठित ‘अहमद अब्दुल्ला गरीब खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थे’ नेस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत ‘स्कॉलरशिप २०२२ वर कार्यशाळा’ आयोजित केली. या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांना मिळणारी स्कॉलरशिप जमा होण्या करिता बॅंक खाते खोलण्या संबंधी माहिती सांगण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुम्ब्रा शाखेचे शाखा प्रबंधक, श्री सतीश दडस आणि ठाणे क्षेत्रीय कार्यालयची सहायक प्रबंधक-राजभाषा सुश्री रेवती आळवे उपस्थित होत्या . या सत्रात बॅंकेच्या विद्यार्थी खाते संबंधी विस्तृत आणि महत्वपूर्ण माहिती देण्यात आली. बॅंक-खात्याचे फायदे-तोटे समजावून सांगण्यात आले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांचे विद्यार्थी खाते खोलण्याकरिता फार्म भरण्यात आले.
या कार्यशाळेच्या दुस-या सत्रात ‘अस सुफह फाउंडेशन, मुम्ब्रा’ चे चेयरमन, श्री सलीम टोले जी, प्राचार्या सुश्री फातिमा जी, सामाजिक कार्यकर्ते श्री बेग साहब जी उपस्थित होते. या प्रत्येकांनी उपस्थित विद्यार्थी-पालक वर्गाला स्कॉलरशिप संबंधी संपूर्ण मुद्देसूद मार्गदर्शन केले.
या वेळी संस्थेचे प्राचार्य श्री फिरोज शेख जी, प्रशिक्षिका सुश्री शमशाद हाजी जी आणि स्टाफश्री अब्दुल शेख जी, अज़हर जी आणि विद्यार्थी-पालक वर्ग उपस्थित होता. या कार्यशाळेचे संचालन लाइब्रेरियन, श्री राजेन्द्र भुर्के यांनी केले. या संस्थेची विशेषता आहे कि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचनालय, महाराष्ट्र राज्य द्वारा विभागस्तरीय उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार (मुंबई विभाग) प्रदान करण्यात आला आहे.


.jpeg)
.jpeg)


0 टिप्पण्या