मित्र असावा
मैत्रीला जागणारा
मित्र असावा
संकटातही मदतीचा
हात
मित्र असावा
धीर देणारा
क्षणभर हितगुज
करणारा....
माणुसकीची वागणूक
देऊन नाती जपणारा
मित्र असावा
असा गुणगान
गाणारा ....
नको चुकांवर
पांघरूण घालणारा
मित्राने रेखाटावे
मित्रांचे चित्र
चित्र राहावे सदैव
मित्रांच्या स्मरणात
मित्र असावा असा
गुणीजनांवर न
जळणारा ....
मित्र असावा असा
मित्र असावा असा
- सुभाष राघू आढाव
गोवंडी, मुंबई
मो. ७४९९४१३०८६

.jpeg)
0 टिप्पण्या