प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग
* उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
इतर १८ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे -
* राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
* सुधीर मुनगंटीवार - वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
* चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
* डॉ. विजयकुमार गावित - आदिवासी विकास
* गिरीष महाजन - ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
* गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता
* दादा भुसे - बंदरे व खनिकर्म
* संजय राठोड - अन्न व औषध प्रशासन
* सुरेश खाडे - कामगार
* संदीपान भुमरे - रोजगार हमी योजना व फलोत्पादन
* उदय सामंत - उद्योग
* प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
* रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
* अब्दुल सत्तार - कृषी
* दीपक केसरकर - शालेय शिक्षण व मराठी भाषा
* अतुल सावे - सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
* शंभूराज देसाई - राज्य उत्पादन शुल्क
* मंगलप्रभात लोढा - पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास


0 टिप्पण्या