जेष्ठ नागरिक,महादेव काठोळे,काल्हेर भिवंडी हृयांच्या हृस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न...

 "हर घर तिरंगा " अभियानांतर्गत, छत्रपती शिवाजी विद्यालय,ठाणे,येथे जेष्ठ नागरिक,महादेव काठोळे,काल्हेर भिवंडी हृयांच्या हृस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न... 




ठाणे -१४ऑगष्ट,रोजी,छत्रपती शिवाजी विद्यालय,करवालोनगर,ठाणे येथे "हर घर तिरंगा"अभियानांतर्गत ध्वजारोहण सोहळा साजरा करण्यात आला.स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यासाठी काल्हेर,ठाणे, येथील वयोवृद्ध जेष्ठ नागरिक मान्यवर- महादेव काठोळे उपस्थित होते, ध्वजारोहनप्रसंगी जेष्ठ नागरिक महादेव काठोळे ह्यांनी,राष्ट्रीय तिरंगा ध्वज फडकवुन राष्ट्रध्वजाला सलामी दिली...



राष्ट्रीय तिरंगा ध्वजारोहन सोहळ्यास छत्रपती शिवाजी विद्यालयाचे संचालक,सन्मा-ब्रिजमणी मिश्रा, सौ-मिनाक्षी मिश्रा,हिंदी माध्यम मुख्याध्यापक- यादव सर, मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका,सौ सुप्रिया हुमने तसेच हिंदी मराठी व इंग्रजी ह्या तिन्ही माध्यमाचे सर्वंच शिक्षक वृंद उपस्थित होते.,प्रमुख पाहुणे,वयोवृद्ध मान्यवर सन्मा-महादेव काठोळे ह्यांना संस्थेच्या संचालिका सौ मिनाक्षी मिश्रा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.समारोपप्रसंगी,वयोव्रुदध महादेव काठोळे ह्यांनी छत्रपती शिवाजी विद्यालयातील सर्व मान्यवरांचे आभार मानले व उपक्रमांचे मनःपूर्वक अभिनंदन करुन,शाळेच्या भावी वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा व्यक्त केल्या..


जगन्नाथ खराटे..ठाणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या