सेन्ट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या संस्थापकांची जयंती साजरी
भारताची पहिली स्वदेशी बॅंक, सेन्ट्रल बॅंक ऑफ इंडियाचे श्रद्धेय प्रणेते सर सोराबजी पोचखनावाला जीं ची १४१ वीं जयंती दिनांक ०९/०८/२०२२ रोजी प्रादेशिक कार्यालय, ठाणे येथे हर्षोल्लासात साजरी करण्यात आली. यावेळी प्रादेशिक प्रमुख, श्री सुधांशु शेखर यांनी दीप-प्रज्ज्वलन करुन श्रद्धा-सुमन अर्पण केली. त्यांनी आपल्या संबोधन भाषणामध्ये संस्थापकांनी केलेले अतुलनीय कार्यांचा उल्लेख करत बॅंकेच्या प्रगतीचा आढावा प्रस्तुत केला. आणि आश्वस्त केले कि सर्वांनी अथक कर्तव्य पार पाडत बॅंक उत्तरोत्तर प्रगती पथाच्या शिखरावर नक्की पोहचेल. प्रादेशिक प्रमुखांच्या अमूल्य मार्गदर्शनानंतर मुख्य व्यवस्थापक श्री जय कुमार सिंह आणि अन्य उपस्थित स्टाफ सदस्यांनी श्रद्धा-सुमन अर्पण केले.
या कार्यक्रमाचे संचालन सहायक व्यवस्थापक -राजभाषा सुश्री रेवती आळवे यांनी केले आणि आभार प्रदर्शन व्यवस्थापक श्री साईनाथ हामंद यांनी प्रस्तुत केले.





.jpeg)

.jpeg)



0 टिप्पण्या