मूलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघ महाराष्ट्र राज्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन संपन्न.




दिनांक .6/7/2022 वार बुधवारी महाराष्ट्र राज्य मूलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन संपन्न झाली. बैठकीचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्याध्यक्ष ,  व केंद्रीय कार्यकारणी सदस्य आणि महाराष्ट्र राज्याचे प्रभारी मा. एडवोकेट मोहन सोनवणे हे होते, सदर ऑनलाईन मीटिंग साठी मा. सुमन तिरपुडे मॅडम हे देखील उपस्थित होते . 

खालील एजेंडा पॉईंट्स नुसार सभा घेण्यात आली.


1) मागच्या बैठकीचे इतिवृत्त वाचून कायम करणे.

2) राज्य महासचिव कडून वार्षिक अहवाल सादर करणे. 

3) राज्य कोषाध्यक्ष यांच्याकडून जमाखर्चाचा अहवाल सादर करणे. 

4) सन 2022 =2023 साठी एम .के. के .एम . नूतन राज्य कार्यकारणी गठीत करणे .

5 )ऐन वेळेचे विषय.


प्रारंभी महाराष्ट्र राज्य मूलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघाचे माजी महासचिव मा. जहिंद्र चव्हाण साहेब यांनी सभेचा पहिला एजेंडा पॉईंट् ,मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त सभेसमोर वाचून दाखवले त्यावर सभेत चर्चा होऊन ते कायम करण्यात आले. दुसरा एजेंडा पॉइंट नुसार त्यांनी महासचिवांचा वार्षिक अहवाल सभेसमोर सादर केला त्यावर देखील सभेत चर्चा होऊन कायम करण्यात आला, 

तिसरा एजेंडा पॉईंट नुसार महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष मा.महेंद्र दहिवले साहेब यांनी जमा खर्च अहवाल सादर केला. त्यावर देखील चर्चा होऊन तो देखील सभेने कायम केला . सभेचा चौथा एजेंडा पॉईंट नुसार सन 2022 - 2023 साठी  मूलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघ ची राज्य कार्यकारणी गठीत करण्यासाठी चर्चा करण्यात आली , त्यात मागील राज्याध्यक्ष व महाराष्ट्र राज्य प्रभारी मा. एडवोकेट मोहन सोनवणे यांनी सन 2021= 2022 ची मागील राज्य कार्यकारणी  डीजॉल्व केली. व सभेत सन 2022 = 2023 साठी नवीन कार्यकारणी गठीत करुन सभेसमोर  मा. सोनवणे साहेबांनी खालिल राज्य कार्यकारीणी जाहीर केली . 


राज्याध्यक्ष मा. डी एस कदम , 


राज्य महासचिव मा. हेमकांत मोरे ,


राज्य कोषाध्यक्ष मा.महेंद्र दहिवले.


 राज्य उपाध्यक्ष (विदर्भ विभाग) मा. अजय झाकर्डे,


 राज्य उपाध्यक्ष ,(पश्चिम विभाग) मा.मिरजकर सर.

उर्वरित राज्य कार्यकारणी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी मा. एडवोकेट मोहन सोनवणे साहेब यांनी पुढील सभेत गठीत करण्यात येईल असे जाहीर केले .

सभेत ऐनवेळच्या विषयावर देखील सविस्तर चर्चा करण्यात आली व नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन  करून सभेची सांगता महाराष्ट्र राज्य मूलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघाचे माजी महासचिव मा. जहिंद्र चव्हाण यांनी  केली.


         धन्यवाद.


    हेमकांत मोरे,

 राज्य महासचिव ,

एम.के.के.एम.महाराष्ट्र राज्य.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या