लोकशाहीर अण्णाभाऊ साठे १०२ व्या जयंतीनिमित्त कविता- साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे

 १ ऑगस्ट २०२२ 

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे १०२ व्या जयंतीनिमित्त कविता-

          


साहित्यरत्न - अण्णा भाऊ साठे


१ ऑगस्ट १९२० रोजी |

सांगली जिल्ह्यात | 

जन्मले अण्णा भाऊ | 

वाळवा तालुक्यातील वाटेगावात ||


वडीलांचे नाव भाऊ |

आईचे नाव वालुबाई | 

अण्णा भाऊंचे | 

मूळ नाव तुकाराम ||


मुंबई ते वाटेगाव |

अण्णा भाऊंनी केला |

पायी प्रवास अन् |

झाले मुंबईत  दाखल ||


मुंबईत केली नोकरी | 

गिरणी कामगार अण्णा भाऊंनी |

लाल बावटा कला पथकाची|

केली स्थापना अण्णा भाऊंनी ||


कष्टकरी श्रमिकांच्या न्यायासाठी |

अण्णा भाऊंनी केले नेतृत्व |

साहित्यातून परिवर्तन निर्मितीसाठी |

अण्णां भाऊंनी मांडल्या व्यथा ||


मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र |

आंदोलनातील अगग्रण्य व्यक्तीमत्व | 

जगविख्यात साहित्यसम्राट |

म्हणजे अण्णा भाऊ ||


अण्णा भाऊंनी फकीरा कांदबरी | 

बाबासाहेबांना अर्पण केली  |

बाबासाहेबांचा क्रांतिकारी विचार 

जग बदल मनामनात कोरला  ||


विषमतेवर केला हल्ला |

घटना व्यक्ती चित्रित करून |

मुंबईची लावणी लिहिली |

शब्दांकित केले प्रवासवर्णन ||


मुंबईतील गोरेगावात अण्णा भाऊंचे |

१८ जुलै १९६९ रोजी  झाले निधन |

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंना |

सुभाष  करांनी कोटी कोटी वंदन ||   



 - सुभाष राघू आढाव

        मुंबई

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या