प्रतिबंधित प्लास्टिक बंदी कारवाई अंतर्गत 77.2 किलो प्लास्टिक जप्त





     280 आस्थापनांकडून  1,80,000 रुपये दंड वसूल 


डोंबिवली ( शंकर जाधव ) केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 1 जुलै पासून एकल प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  प्लास्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी  करण्याकरीता  महापालिकेच्या दहाही प्रभागात 10 स्वतंत्र पथके निर्माण करुन , प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात विशेष कारवाई करण्यात येत आह कारवाई अंतर्गत महापालिकेच्या‍ सर्व प्रभागात अनेक ठिकाणी काल दिवसभरात धडक कारवाई करण्यात आली आणि सर्व प्रभागातील एकुण 280 आस्थापनांना  कडून  77.2 किलो प्लास्टिक जप्त करून  1,80,000 रुपये   इतका दंड  वसूल  करण्यात आला.


    सदर कारवाई प्रत्येक प्रभागातील स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, मुकादम, अनधिकृत बांधकाम नियंत्रण व फेरीवाला प्रतिबंधक पथकाचे कर्मचारी, पोलिस यंत्रणा यांच्यामार्फत संयुक्तरित्या करण्यात आली.  पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर कटाक्षाने टाळावा, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या