देशमुख होम्स मधील महिलांचा मोर्चा



 एमआयडिसी अधिकाऱ्यांच्या आश्वासनंतर आंदोलन मागे

डोंबिवली ( शंकर जाधव ) येथील देशमुख होम्स मधील महिलांनी मंगळवारी एमआयडीसीच्या पिंगारा स्थित पंप हाऊसवर मोर्चा काढला.भर पावसात महिला मोठया संख्येने सहभागी झाले होते.आंदोलनाची दखल घेत  एमआयडीसी अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांबरोबर चर्चा केली.

देशमुख होम्सच्या पाणी प्रेशरचा  प्रश्न निकाली लावू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी  दिले.

   देशमुख होम्स मधील रहिवासी तथा समाजसेविका वंदना सोनावणे यांनी काही  दिवसांपूर्वी आमरण उपोषण केले होते.येथील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या उपोषणाची दाखल घेऊन मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी सोनावणे यांची भेट घेतली होती.सदर प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले होते.

   येथील पाणी प्रश्न बूस्टर हे कारण असल्याचे समाँजसेविका वंदना सोनावणे यांनी सांगितले होते.आपल्या हक्काचे पाणी इतर ठिकाणी वळविण्यात आल्याचा आरोप सोनावणे यांनी केला.एमआयडीसीच्या पिंगारा स्थित पंप हाऊसवर मंगळवारी येथील महिलांनी मोर्चा काढला.महिलांनी मोर्चा काढल्याचे समजताच मानपाडा पोलिसांनी मोर्चेकरी महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.पुढे एमआयडीसी अधिकारी, पोलीस आणि मोर्चेकरी यांच्यात चर्चा झाली.

   या चर्चेत एमआयडीसी अधिकाऱ्यांनी कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे बोट करत हात वर करण्याचा प्रयत्न केला. बूस्टर हा पाणी टंचाईचा कारण अजिबात नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले.पाणी प्रश्न सोडवू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर  देशमुख होम्स शिष्ट मंडळाने यावर विश्वास नसल्याचे सांगितले.मात्र लवकरच यावर मार्ग काढू असे आश्वासन दिल्यावर मोर्चेकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या