डोंबिवली ( शंकर जाधव )
रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे पश्चिम डोंबिवलीमध्ये एक साप मानवी वस्तीकडे आला आणि त्याने एका सोसायटीच्या पंप रूमचा आसरा घेतला. अखेर या सापाला सर्प मित्रांनी पकडून सुरक्षित स्थळी जंगलात सोडून दिले.
अतिपावसामुळे मंगळवारी दुपारच्या सुमारास एक साप पश्चिम डोंबिवलीतल्या महाराष्ट्र नगरमधील एसबीएम परिवार नामक सोसायटीच्या पंपरुम जाऊन बसला होता. भल्या मोठ्या सापाला पाहून सोसायटीतील रहिवाश्यांची भंबेरी उडाली होती. मात्र काहींनी तात्काळ मनसे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर स्थानिक नगरसेवक प्रकाश भोईर, शहर सचिव संदीप उर्फ रमा म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्याला पकडण्यासाठी सर्प मित्रांना पाचारण करण्यात आले. सर्पमित्र सपी म्हात्रे आणि सनी खैरमोडे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून या सापाला पकडले आणि पिशवीत जेरबंद करून खाडी किनारी असलेल्या जंगलात सोडून दिले.


0 टिप्पण्या