कल्याण-डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला

 रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात





डोंबिवली ( प्रतिनिधी )


गेल्या महिन्याभरापासून कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागामध्ये ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. मात्र रविवारपासून कल्याण-डोंबिवलीत पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती.डोंबिवली पश्चिमेककडील रेती बंदर रोड तर पूर्वेकडील नांदीवली मठाजवळील रस्ता जलमय झाला होता.


     अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. मात्र दुपारपासून कल्याण-डोंबिवली शहर आणि ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर वाढला. परिणामी दखल भागात पाणी साचायला सुरूवात झाली. पादचारी, रिक्षाचालक, वाहनचालक, दुचाकीस्वारांना साचलेल्या पाण्यातून वाट काढवी लागत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. अजून दोन तास असाच पाऊस पडत राहिला तर मात्र कल्याण-डोंबिवली परिसरातील अनेक सखल ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या