शौचालय येत्या १० जुलैपर्यंत नागरिकांना खुले करुन देण्यासाठी मनसेचा मनपाला जाहीर इशारा





 जोगेश्वरी - प्रभाग क्र.७३, जोगेश्वरी (पुर्व), अंबिका नगर, येथील (लालजी यादव चाळ, फकिरा चाळ) मधील (१२x१६) आसनी शौचालय व (०२ पाश्चात्य) शौचालयाच्या नुतनीकरणाबाबत यापूर्वी मनसे तर्फे सातत्याने पत्र व्यवहार केल्यानंतर काम सुरु झाले खरे, परंतु वर्ष उलटुनही शौचालयाचा प्रश्न ऐरणीवर असताना नागरिकांना होणार्‍या त्रासाबाबत कोणालाही गांभीर्य नसल्याचे दिसुन येत असल्यामुळे मनसेने  स्थानिक नागरिकांच्या तक्रारीची  दखल घेत मनपाने उर्वरीत राहिलेले काम त्वरीत पूर्ण करुन १० जुलै पर्यंत शौचालय नागरिकांस खुले करुन द्यावे अस विनंतीवजा पत्र उपाध्यक्ष प्रविण मर्गज, विभाग अध्यक्ष बाबूभाई पिल्ले, शाखा अध्यक्ष रमाकांत नर, अमोल पारधी, कूणाल गावडे यांनी सहाय्यक आयुक्त / प्रशांत सपकाळे यांची सोमवार दि.२७ जून रोजी भेट घेत त्यांना देण्यात आले.यानंतर चर्चेअंती सहाय्यक आयुक्तांच्या सुचनेप्रमाणे मनपा अधिकारी व ठेकेदार यांनी दुसर्‍याच दिवशी प्रत्यक्ष पाहणी करत शिल्लक काम येत्या ७ जुलै पर्यंत पूर्ण करुन नागरिकांना शौचालय वापरण्यास खुले करु असे आश्वासन विभाग अध्यक्ष बाबूभाई पिल्ले, शाखा अध्यक्ष रमाकांत नर, कुणाल गावडे, केबल सेनेचे पांडुरंग मांजरेकर राजदूत करण शर्मा यांच्याशी चर्चा करते वेळी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या