मुंबई- राज्यातील शिवसेनेच्या पडझडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी एखाद्या पहाडासारखे उभे राहिलेले बेस्टचे माजी अध्यक्ष आणि चेंबूरचे लोकप्रिय नगरसेवक अनिल पाटणकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चेंबूरच्या घाटले परिसरातील खारदेवनगर मार्केटमधील छत्रपती सेवा मंडळ केंद्र येथे भव्य महाआरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते.
सात्विक हॉस्पिटलचे डॉ. संतोष गोसावी यांच्या विशेष सहकार्याने आयोजित केलेल्या या महाआरोग्य तपासणी शिबीर प्रसंगी चेंबूर विधानसभा संघटक अविनाश राणे,महिला उपविभाग संघटिका सुलभा पात्याने, शाखाप्रमुख उमेश करकेरा, महिला शाखा संघटीका अनिता महाडिक, समाजसेविका मिनाक्षी पाटणकर, कार्यालय प्रमुख मारूती वाघमारे, छत्रपती सेवा मंडळ केंद्र अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे, युवासेना चेंबूर विधानसभा समन्वयक गणेश गायकवाड, युवासेना उपविभाग अधिकारी विनय साठले, युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये शिवसेना - युवासेना महिला पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.यावेळी परिसरातील सर्व स्तरातील शेकडो नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला


0 टिप्पण्या