चेंबूरकर मंडईतील मच्छिविक्रेत्यांची प्रचंड दुरवस्था ! सुविधांचा अभाव

 



मुंबई- चेंबूर नाक्यावरील पालिकेच्या भाऊराव हरिश्चंद्र चेंबूरकर मंडईतील पुनर्विकास कामासाठी याठिकाणी असलेल्या मच्छिमार विक्रेत्यांना आणि व्यापाऱ्यांना त्याच परिसरात स्थलांतरित करण्यात आले आहे.मात्र आजतागायत या मच्छिविक्रेत्यांना आणि व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोणत्याही मूलभूत सुविधा पुरविण्यात न आल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे.


गेल्या २८ दिवसांपूर्वी याठिकाणचे मटण विक्रेते  मच्छिमार बंधू-भगिनी आणि काही व्यापारी यांना मंडईच्या बाजूलाच स्थलांतरित करण्यात आले आहे.मात्र त्याठिकाणी भर पावसात सर्वांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शौचालय नाही, वीज नाही, शेड नाही, सर्वत्र घाणीचे,दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.साफसफाई केली जात नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच चोर्‍या होऊ लागल्याने हे मच्छिमार विक्रेते आणि व्यापारी पुरते वैतागले आहे.यासंदर्भात स्थानिक नगरसेविका आशाताई मराठे यांनी याठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून पालिकेने तत्काळ या सर्वांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.पालिका प्रशासनाच्या आश्वासनांमुळे आणि नगरसेविका मराठे यांच्या मध्यस्थीनेच या सर्वांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या