महाराष्ट्रातील प्रख्यात शहरांमधे कल्याण डोंबिवली चे नाव गणले जाते. त्यात डोंबिवली हे ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध शहर असून हे शहर सामाजिक बांधिलकी व संस्कृती मुळे ओळखले जाते, डोंबिवली ला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असेही संबोधले जाते. कल्याण शहरासही मोठा इतिहासाचा वारसा लाभला आहे, पछिम किनाऱ्यावरील सुसज्ज बंदर, व्यापाराचे मोठे ठिकाण म्हणून कल्याण शहर प्रसिद्ध होते.
अश्या या कल्याण डोंबिवली शहराच्या प्रथा, परंपरा, कथा, दंतकथा, पुराण, धार्मिक, शिवकाल, पेशवाई व पारतंत्र्य ते स्वातंत्र्य काळातील विविध घडामोडींनी गजबजलेला वैभवशाली ऐतिहासिक प्रवास थक्क करतो. पण हे शहरातील सामान्य माणसाला ठाऊक आहे का? तर नाही! या शहराचा इतिहास फार सूंदर आहे, पण दुर्दैवाने तो फारसा कोणास माहित नाही.
याचेच विविध पैलू आनुभवण्यासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ़ डोंबिवलीने ' शोध वारसाचा ' या नावाने एक उपक्रम राबवला. या उपक्रमामध्ये कल्याण डोंबवलीतील काही छुप्या, धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणांना क्लबच्या सदस्यांनी भेट देऊन त्यांचा इतिहास पुन्हा जागा केला.
आपल्या शहराच्या वारसा चा शोध घेण्याच्या मोहिमेची सुरुवात २४ जुलै २०२२ रोजी पहाटे ७ वाजता आराध्य दैवत श्री गणेशाचा आशीर्वाद घेत गणपती मंदिर, फडके रोड डोंबिवली येथून झाली. या प्रवासात गणेश मंदिर फडके रोड, कॅप्टन विनयकुमार सचान स्मृती स्थळ, बिर्ला मंदिर, काळा तलाव, दुर्गाडी किल्ला, पोखरण तलाव या ठिकाणांना भेट देण्यात आली व तिथल्या ईतिहासाची माहिती देण्यात आली. या मोहिमे अंतर्गत शहरातल्या सर्व नागरिकांना विशेषत: तरुण पिढीला आपल्या शहराचा वारसा किती थोर आहे हे दाखवून देण्यात आले. कल्याण डोंबिवलीचा वारसा हा फार मोठा आहे ज्याची माहिती देणे एका दिवसात संपणार नाही म्हणून हा प्रकल्प अनेक टप्प्यांमध्ये केला जाईल असं क्लबचे अध्यक्ष रो. अनिकेत शिरकर यांनी स्पष्ट केले. प्रकल्पाच्या पहिलया टप्याची सांगता प्रकल्प-प्रमुख रो. सागर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी रित्या पार पाडण्यात आली.
जर वाचक मंडळी मधून कोणी या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांमध्ये शामिल होण्यास इछुक असेल तर कृपया क्लब च्या Rotaract club of Dombivli या फेसबुक पेज ला व @rcdombivli या इंस्टाग्राम पेज ला फॉलो करावं कारण कल्याण- डोंबिवली चा इतिहास फार सूंदर आहे... आणि ते प्रत्येक कल्याण- डोंबिवलीकरांनी ऐकलेच पाहिजे.


.jpeg)

0 टिप्पण्या