रेल्वे यार्डातील माथाडी कामगारांच्या सुविधांच्या आश्वासनांची पूर्तता करा !




* माथाडी नेते गुलाबराव जगतापांची मागणी 


मुंबई - मध्य रेल्वेच्या मुलुंड कल्याण, कळंबोली, तुर्भे, अंबरनाथ, तळोजा रेल्वे यार्डात कष्टाची कामे करणाऱ्याला माथाडी कामगार व अन्य घटकांसाठी रेल्वे यार्डात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आश्वासनांची पूर्तता रेल्वे अधिकार्‍यांनी करावी ,अशी मागणी  ज्येष्ठ आणि धडाडीचे माथाडी कामगार नेते गुलाबराव जगताप यांनी मध्य रेल्वेचे वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक यांच्याकडे केली आहे. 


माथाडी कामगार आणि  अन्य घटकांसाठी अत्यावश्यक असलेल्या म्हणजे पिण्याचे पाणी, यार्डात दिवाबत्ती, शौचालय, विश्रांतीगृह आदी सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्याचे तसेच रेल्वे प्लॅटफॉर्म दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती,पाणी गळती थांबविणे व इतर बाबीसंबंधी येत्या कांही कालावधीत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन आज मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक  कुश मिश्र यांनी दिले.यावेळी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी ही मागणी केली.जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक कुश मिश्र यांचेसमोर विविध रेल्वे यार्डात सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या प्रश्नासंबंधी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकिस मध्य रेल्वे  कुश मिश्र वरिष्ठ वाणीज्य प्रबंधक शिलभद्र गौतम, मधुसुदन तसेच  युनियनचे संयुक्त सरचिटणीस दिलीप खोंड, सेक्रेटरी बाळासाहेब गुजर, संजय चोरमले, कार्यकर्ते भिमराव जाधव, कृष्णा आबा मराठे, रंगनाथ आदक,आसाराम चव्हाण, आत्माराम वाघमोडे,बळीराम ननावरे, संजय निरभवणे, दि रेल्वे लेबर बोर्डाचे अधिकारी  भरत रामिष्टे, डाकवे आदी संबंधित अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


शासनाच्या दि रेल्वे लेबर बोर्डात नोंदीत असलेले या कामगार युनियनचे सभासद माथाडी कामगार रेल्वेच्या विविध यार्डात सिमेंट व अन्य मालाची चढ-उताराची कामे करतात.कष्टाची कामे करणा-या या माथाडी कामगार व अन्य घटकांसाठी रेल्वे यार्डात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, विश्रांतीगृह नाही, दिवाबत्तीची सोय नाही, रस्ते व प्लॅटफॉर्म नादुरुस्त आहेत, या सर्व प्रश्नांची सोडवणुक होण्यासाठी युनियनने वारंवार रेल्वे प्रशासनाकडे निवेदने सादर केली, यापूर्वी रेल्वे अधिका-यांसमोर अनेक संयुक्त बैठका झाल्या, परंतु कोणतीही कार्यवाही होत नव्हती,म्हणून युनियनने मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक कुश मिश्र यांच्याकडे केलेल्या विनंतीनुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या