मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबीर
डोंबिवली ( शंकर जाधव ) महाराष्ट्रातील तरूण-तरुणींना रोजगार मिळावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने डोंबिवलीतील परप्रतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाला यश आले.रेल्वेभरतीत राज्यातील मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रात प्रशासनाकडून जाहीर करणे सुरु झाले.या यशानंतर आणखी एक पाउल पुढे जात मनसेने राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी विविध क्षेत्रात तरुण-तरुणींना रोजगाराची संधी मिळावी याकरता शिबिराचे आयोजन केले जात आहे. महाराष्ट्रत होणाऱ्या पोलीस भरती मध्ये जास्तीत जास्त तरुण-तरुणांचा समावेश व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंबिवली शहर अध्यक्ष मिलींद म्हात्रे यांच्यावतीने सर्वेश सभागृहात मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबीर भरविण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे कल्याण ग्रामीण व डोंबिवली शहर विधानसभा उपाध्यक्ष अनिल वलेकर, गुहागर तालुका माजी संपर्क अध्यक्ष गणेश कदम,उपशहर अध्यक्ष सुहास काळे, प्रतिक देशपांडे, परेश भोईर, उपविभाग अध्यक्ष मितेश नायर, कुणाल मोर्ये, उपशाखा अध्यक्ष अमेय पंडित,दिप्तेश नाईक, विशाल कदम,शाखा अध्यक्ष हेमंत पाटणकर, पूर्वेश आरेकर, चिन्मय वारंगे,शुभंकर कुलकर्णी ( जिमखाना ),रीतीकेश गवळी,सौरभ कुलकर्णी,ऋषिकेश गावंकर,विभागअध्यक्ष मोहन हेबळे, समीर पाटील,शहर सचिव सागर केंजळे, शहर सचिव प्रीतेश म्हामुणकर, गणेश यादव, प्रीतेश पाटील,उपशहर अध्यक्ष प्रेम पाटील आदींनी अथक मेहनत घेतली. यावेळी मार्गदर्शन शिबिरात ३०० हून अधिक तरुण-तरुणींनी सहभाग घेतला होता. यावेळी राठोड यांनी मैदानी परीक्षेबाबत उपस्थित तरुणवर्गाला मार्गदर्शन केले.तर लेखी परीक्षेबाबत मार्गदर्शन करताना मान्यवरांनी अगदी थोडक्यात आणि सोप्या शब्दात माहिती दिली.

.jpeg)
0 टिप्पण्या