केंद्र सरकारची देशात कोरोना लसीकरणाची विक्रमी भरारी ! २०० कोटी डोसचा टप्पा पार..




प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

  भारताच्या कोरोनाविरोधी लसयुद्धात महत्वाचा आणि मोठा विक्रम करत भरारी घेतली आहे. खरंतर हा महाविक्रम आहे. आज भारताने २०० कोटी लसींच्या डोसचा टप्पा सर केला. आज सकाळच्या तात्पुरत्या अहवालानुसार भारताच्या देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने १९९.९८ कोटी (१,९९,९८,८९,०९७) मात्रांचा टप्पा पार केला. २,६३,२२,३४५ सत्रांमधून लसीकरणचा हा टप्पा गाठण्यात आला आहे. याचा अर्थ आतापर्यंत देशात २०० कोटी डोसचा आकडा गाठला गेला आहे.



  देशातील १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुला मुलींकरिता कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम १६ मार्च २०२२ रोजी सुरू झाली. आतापर्यंत ३.७९ कोटीहून जास्त (३,७९,८२,२५१) किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे १० एप्रिल २०२२ पासून १८ ते ५९ वयोगटातल्या नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.


  आज सकाळी ७ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs 1st Dose 1,04,10,322

2nd Dose 1,00,79,660

Precaution Dose 60,21,211

FLWs 1st Dose 1,84,27,518

2nd Dose 1,76,52,093

Precaution Dose 1,14,59,871

Age Group 12-14 years

1st Dose 3,79,82,251

2nd Dose 2,62,02,322

Age Group 15-18 years

1st Dose 6,08,43,400

2nd Dose 5,01,13,916

Age Group 18-44 years

1st Dose 55,88,87,272

2nd Dose 50,58,64,044

Precaution Dose 62,19,363

Age Group 45-59 years

1st Dose 20,35,68,118

2nd Dose 19,45,59,339

Precaution Dose 45,13,607

Over 60 years

1st Dose 12,73,60,055

2nd Dose 12,15,70,899

Precaution Dose 2,81,53,836

Precaution Dose 5,63,67,888

Total 1,99,98,89,097


  भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या सध्या १,४३,४४९ इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ०.३३% इतकी आहे.


  परिणामी, देशात रुग्ण बरे होण्याचा दर ९८.४% झाला आहे. गेल्या २४ तासात १७,७९० कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून ४,३०,८१,४४१ झाली आहे.


गेल्या २४ तासात २०,५२८ नवे रुग्ण आढळले.


गेल्या २४ तासात एकूण ३.९२,५६९ चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण ८६.९४ कोटींहून अधिक (८६,९४,२५,६३२) चाचण्या केल्या आहेत.


साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या ४.५५% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर ५.२३% आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या