डोंबिवली ( शंकर जाधव ) पर्यावरणास घातक असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका , कागदी किंवा पिशव्यांचा वापरा अश्या सुचना प्रशासनाकडून दिल्या जातात.मात्र पर्यावरणाचा विचार न करणारे अनेकजण प्लास्टिक पिशव्या वापरताना दिसतात.पालिका प्रशासनास दुकानदार व फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगरतात.परंतु प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या नागरिकांवर मात्र कोणतीही कारवाई केली जात नाही.अश्या वेळी डोंबिवलीतील फेरीवाल्यांनी ग्राहकांना भाजी, फळे देताना प्लास्टिक पिशव्या देणार नसल्याचे ठरविले.फेरीवाल्यांच्या या उपक्रमास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.पालिकेचे फेरीवाला अतिक्रमण हटाव विभागाचे पथक प्रमुख विजय भोईर व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाबाबत फेरिवाल्यांचे कौतुक केले.विशेष म्हणजे आपल्याप्रमाणे इतर भागातील फेरिवाल्यांनाही या उपक्रमात भाग घ्यावा म्हणून जनजागृती करताना फेरीवाल्यांबरोबर पथक प्रमुख भोईर हेही उपस्थित होते.
डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनपासून १५० मीटरच्या बाहेर फेरीवाले बसतात.येथील पथक प्रमुख भोईर व कर्मचारी यांनी स्टेशनबाहेरील परिसर फेरीवाला मुक्त ठेवला आहे.गोमंतक बेकरी पुढील फेरीवाल्यांनी ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या देणार नाही असे फलक लावले.येथील फेरीवाले अभय दुबे,व राजू गुप्ता, राजू सोनावने यांनी सम्राट हॉटेल रस्त्यावरील फेरीवाल्यांमध्ये जनजागृती करण्याचे ठरविले.याची माहिती पथकप्रमुख भोईर व कर्मचाऱ्यांना समजताचतेही जनजागृतीत सहभागी झाले.जनजागृतीने येथील फेरीवाल्यांनीसुद्धा अश्या प्रकारे फलक लावले.विशेष म्हणजे भाजी- फळे विकत घेण्यासाठी येणारे नागरिक कापडी पिशव्या घेऊन येत असताना दिसतात.
येथील फेरीवाले, पथकप्रमुख भोईर व कर्मचारी यांचे पालिका प्रशासनाने कौतुक करणे आवश्यक आहे.



0 टिप्पण्या