चेंबूरमधील प्रति पंढरपूर ठरलेल्या विठ्ठल मंदिरात भाविकांची मांदियाळी



मुंबई- चेंबूरमधील घाटले गाव परिसरातील नागेश पाटीलवाडी येथील प्रसिद्ध, प्रति पंढरपूर समजल्या जाणार्‍या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात यंदा तब्बल ४१ वर्षी आषाढी एकादशी सोहोळ्यासाठी भाविकांची मांदियाळी दिसून आली. 


शेकडो भाविकांनी  पहाटे पासूनच दर्शनासाठी रांग लावली होती. हा आषाढी सोहळा चेंबूरमधील तुळशीमाला धारण केलेल्या वारकरी आणि सामान्य भाविकांसाठी एक पर्वणी ठरत असते.गेली दोन वर्षे  कोरोना निर्बंध असल्याने सोहळा भरला नव्हता. मात्र यंदा या सोहोळ्याला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.हभप   धोंडीराम महाराज चिकणेबुवा यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या सोहळ्याला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अन्य राजकिय नेत्यांसह नवी मुंबई येथील उद्योजक आणि हभप जगन्नाथ दाते,समाजसेवक सुजित पाटील आणि भूषण पाटील यांनी सह कुटुंब हजेरी लावली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या