कविता: नजर लागली एकीला
वैयक्तिक स्वार्थ साधण्यासी, सोडूनी गेले समितीला।
कोण्या मेल्याची नजर लागली, धरणग्रस्तांच्या एकीला।धृ।।
जेव्हा सर्वांची होती तळमळ,
तेव्हा होते पहा एकीचे बळ।
नव्हते धाडस कुणा, एकी फोडण्याचे,
सरकारी बाबुने कान फुंकले एकमेकांचे ।।
तिथेच घरचे भेदी झाले, विसरले
त्या भक्तीला ।।१।।
कोण्या मेल्याची नजर लागली, धरणग्रस्तांच्या एकीला
तुला नको मला ही नको, घाल कुत्र्याला।
अशीच स्थिती झाली आहे,आजच्या या घडीला ।
कावेबाज खेळ खेळले बाबू, काय म्हणावे त्या विकृतीला?।।२।।
कोण्या मेल्याची नजर लागली,धरणग्रस्तांच्या एकीला
साध्य होणार काही नाही यातून,
जे-जे जातील एकी सोडून।
स्वतःच्या पायांवर दगड घातले
आपापसांत का वैर मातले?।।
अजूनी ऐकुनी व्हावे शहाणे, सागोसुताच्या विनंतीला ।। ३।।
कोण्या मेल्याची नजर लागली,धरणग्रस्तांच्या एकीला
कवी : सागोसुत-हरिसतोष
संतोष गोपाळ सावंत
१६ जून २०२२
(१२.३० वाजता)


0 टिप्पण्या