समता स्वातंत्र्य बंधुत्व
शब्दांकन केलेस
आंबेडकरी विचारां ची
पेरणी केलीस
भिमराज की बेटीचा
स्वाभिमान जागृत केलास
भिमराज की बेटी
अजरामर केलीस
दोनच राजे इथे गाजले
कोकण पुण्य भूमी वर
एक त्या रायगडा वर
एक चवदार तळ्या वर
प्रताप त्यांचा कथन केलास
स्वाभिमानी बाणा चा
कवी - गायक शोभतो
शिष्य .....
महाकवी वामनदादा कर्डकाचा
प्रज्ञासूर्यापुढे टेकविलास माथा
तुझा भिमबाणा ...आंबेडकरी बाणाचा
गातो आज इथे गुणगान
तुज विनम्र अभिवादन!
गोवंडी, मुंबई
मो. ७४९९४१३०८६



0 टिप्पण्या