जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केडीएमसी , श्री लक्ष्मीनारायण संस्था, पर्यावरण दक्षता मंडळ ,ऊर्जा फाउंडेशन ,ईशा फाउंडेशन ,प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय बी.के संगीता बहन आणि स्वच्छ डोंबिवली अभियान यांच्यातर्फे शनिवारी पश्चिम येथील भागशाळा मैदान येथे जनजागृती करण्यात आली यावेळी पर्यावरण संवर्धन या विषयावर रूपाली शाईवाले त्यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले जागृत जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मी माझ्या वसुंधरा साठी काय करू शकतो किंवा शकते या स्पर्धेचे विजेते श्रीकांत कांबळे यांचा केडीएमसीचे स्वच्छता निरीक्षक वसंत देगलूरकर आणि ऊर्जा फाऊंडेशनच्या स्नेहल दीक्षित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
ईशा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून सेव्ह होईल चा संदेश देणाऱ्या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले यावेळी श्री लक्ष्मीनारायण संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा जोशी यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करणारे गीत सादर केले .स्वच्छ अभियान कार्यकर्ते अनिल मोकल , मेधा गोखले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच बी.के.केशव भोईर,बी.के. चंद्रकांत भाई ,बी.के.मनीषा बहन,बी.के.तेजा बहन आणि डोंबिवली सेंटरचे भाई -बहने यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली .यापुढे आमच्या पुढील उपक्रमांत सहभागी व्हावे अशी बी.के. तेजा बहन यांनी विनंती केली


0 टिप्पण्या