नरडवे धरणग्रस्तांमध्ये हाणामारी, पोलिस स्टेशनात तक्रारी


 

 पोलिसात तक्रार दाखल, माहितीच्या अधिकारात माहिती मागवल्याचा राग 



(७ जून २०२२)

 कणकवली: नरडवे धरण स्टॉपनजीक मंगळवारी सायंकाळी 4 वा. च्या सुमारास चंद्रकांत सोमा नार्वेकर (74, रा. नरडवे-महमंदवाडी) यांना लुईस बस्त्याव डिसोजा (रा. कनेडी) आणि विजय कृष्णा जुवेकर (रा. नरडवे) यांनी तू माहितीच्या अधिकारात माहिती मागतो काय? अशी विचारणा करून शिवीगाळ करत हाताच्या ठोशाने मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी लुईस डिसोजा व विजय कृष्णा जुवेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मारहाण करणारे लुईस डिसोजा यांनीही चंद्रकांत नार्वेकर यांच्याविरूध्द शिवीगाळ केल्याची तक्रार नार्वेकर यांच्या तक्रारीच्या आधी केल्याची माहिती नार्वेकर यांचे चिरंजीव अजय नार्वेकर यांनी आमच्या लोकसत्यवाणीच्या प्रतिनिधीशी दिली.


चंद्रकांत नार्वेकर हे निवृत्त पोलिस कर्मचारी असून ते नरडवे प्रकल्पग्रस्त आहेत. मंगळवारी सायंकाळी कणकवली पोलिस स्थानकात येऊन त्यांनी आपणास मारहाण झाल्याची तक्रार नोंदवली. तर लुईस डिसोजा यांनीही चंद्रकांत नार्वेकर यांच्याविरूध्द दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तेही धरणग्रस्त आहेत. मंगळवारी सायंकाळी नरडवे धरणाजवळ संतोष राणे यांच्या दुकानाजवळून ते जात असताना समोरून चंद्रकांत नार्वेकर हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी लुईस यांना उद्देशून तुझे या गावात काय काम आहे? तुम्ही कनेडी, कणकवली येथे घरे बांधली आहेत असे म्हणून शिवीगाळ करत अंगावर धावून आले. या प्रकरणी चंद्रकांत नार्वेकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित भ्रस्ट प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्याची दाट शक्यता 

दरम्यान मंगळवार सायंकाळी कणकवली पोलिस स्थानकाच्या आवारात नरडवे धरण कृती समितीचे अध्यक्ष गणेश ढवळ, सचिव प्रभाकर ढवळ, उपाध्यक्ष नित्यानंद सावंत, कार्याध्यक्ष प्रकाश सावंत, जिल्हा पुनर्वसन समितीचे अशासकीय सदस्य संतोष सावंत हे उपस्थित होते. संतोष सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना पर्यायी शेतजमिनीसाठी पात्र 299 जणांची यादी तयार करण्यात आली होती. त्यात 67 नावे कमी करून अन्य 67 नावे घालण्यात आली. हा प्रकार समजल्यानंतर चंद्रकांत नार्वेकर यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली आणि संबंधित अधिकार्‍यांकडे याबाबत तक्रार केली. त्याच रागातून चंद्रकांत नार्वेकर यांना मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला.

या प्रकरणात त्यांना साथ देणारे संबंधित अधिकारी गळाला लागण्याची दाट शक्यता आहे, असे लोकांमध्ये बोलले जात आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या