पूरग्रस्त केवनाळे ता.पोलादपूर दुर्घटनेत पाय गमावलेल्या साक्षीला डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून अत्याधुनिक कृत्रिम पाय सुपूर्द.
विश्वनाथ पंडित
गेल्यावर्षी दुर्घटनेनंतर साक्षीला मुंबईतील के ई एम रुग्णालयात साक्षीवर उपचार करण्यात आले. त्यावेळी रुग्णालयात समक्ष भेट देऊन श्री शिंदे साहेब यांनी साक्षीच्या उपचारासाठी 5 लक्ष रुपयांची थेट आर्थिक मदत केली होती. यावेळी त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृत्रिम पाय बसविण्याच्या डॉक्टरांना सूचना दिल्या होत्या त्या नुसार नगरविकास मंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते साक्षी दाभेकर हिला अत्याधुनिक कृत्रिम पाय बसविण्यात आला. यावेळी साक्षी च्या चेहऱ्यावर एकच स्मित हास्य उमटले.
डॉ अंकुश सेठ यांच्या टीमने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून अत्याधुनिक कृत्रिम पाय साक्षीला बसविण्यात आला. यावेळी मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, चित्रपट निर्माते मंगेश देसाई, साक्षीचे काका रमेश दाभेकर, आणि ग्रामस्थ मंडळाचे ज्ञानोबा दाभेकर, तुकाराम दाभेकर, पांडुरंग दाभेकर उपस्थित होते.
दोन वर्षाच्या बाळाला वाचविण्याऱ्या साक्षीच्या धाडशी अतुलनीय कामगिरी बद्दल बाल शोर्य पुरस्कारासाठी दिल्लीत पाठपुरावा करणार असल्याचे खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले.
साक्षीचे धाडसी कार्य पूरस्थितीत, अत्यंत धोकादायक परिस्थिती असतानाही पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावातील शेजारच्या दोन महिन्याच्या मुलाला यशस्वीपणे वाचवताना भिंत अंगावर कोसळून साक्षी दाभेकर (वय १४) ही क्रीडापटू जबर जखमी झाली होती. तिला तातडीने मुंबईत हलवण्यात आले. 'केईएम'मध्ये डाव्या पायावर शस्त्रक्रिया करून दुदैवाने पाय गुडघ्यापासून खाली कापावा लागला होता. या मुलीची घरची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची असल्याने पुढील उपचाराच्या लाखो रुपयांच्या खर्चाचा प्रश्न उभा राहिला असतांना नगरविकास मंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून हि जबाबदारी उचलली. साक्षीला मदत मिळावी यासाठी मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रविंद्र मालुसरे यांनी अथक परिश्रम घेतले.
साक्षीचे ऑलम्पिक मध्ये धावण्याचे स्वप्न असून या स्वप्नपूर्तीसाठी डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.


0 टिप्पण्या